नवी दिल्ली, 14 मार्च : टेक्नोलॉजी कंपनी गुगलने (Google) एक नवं फीचर सुरू केलं आहे. कंपनीने आपल्या युजर्ससाठी फायदेशीर व्हॉइस पार्किंग फीचर (Voice Parking Feature) आणलं आहे.
या नव्या फीचरद्वारे युजरला आपल्या आवाजाचा वापर करुन पार्किंग पेमेंट (Parking Payment) करण्याची सुविधा मिळेल. युजर्सला पार्कमोबाइलसह पार्टनरशिपद्वारे पार्किंग पेमेंटची सुविधा दिली जाईल. ही पार्टनरशिप ट्रान्सपोर्ट सेगमेंटमधील असून गुगल मॅप्समध्ये (Google Maps) बाइकिंग आणि राइड हेलिंग सामिल करणं आहे. डिजिटल की डेव्हलप करणं आणि वाहनात आपल्या अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टमला इंटिग्रेट करण्यासाठी व्हीकल मेकर्ससह काम करणं या गोष्टी सामिल आहेत. युजर्सला पार्कमोबाइलसह पार्टनरशिपची पोहोच सध्या मर्यादित आहे. पार्किंग गुगलला त्याच्या ग्राहकांच्या दैनंदिन जीवनात आणखी इंटिग्रेट करण्यासाठी मदत करते.
हे विना Internet ही वापरता येईल Google Maps, पाहा सोपी ट्रिक
हे व्हॉइस फीचर अतिशय इंटरेस्टिंग आहे. ज्यावेळी तुम्ही कार पार्क कराल, त्यावेळी गुगलला Hey Google बोलावं लागेल. Hey Google Payment For Parking असं बोलावं लागेल. त्यानंतर फोनमधून पेमेंट करण्यासाठी Google Assistant ला फॉलो करावं लागेल. Google Pay तुमचा आवाज ऐकल्यानंतर ट्रान्झेक्शन मॅनेज करतो. तर अँड्रॉइड अपग्रेडद्वारे युजरला किती वेळ आहे हे शोधण्यास मदत होईल. त्यानंतर Voice Command साठी टाइम जोडला जाईल. Google ला कमांड देऊन तुम्हाला केवळ Hey Google, Parking Status किंवा Extended Parking बोलावं लागेल.
हे Google Maps द्वारे केवळ लोकेशनच नाही, तर आता कमाई करण्याचीही संधी, पाहा डिटेल्स
दरम्यान, Google Maps आता युजर्सला केवळ योग्य ठिकाणी पोहोचवण्याचं काम करत नाही, तर याद्वारे कमाईचीही संधी देत आहे. काही सोप्या गोष्टी समजून घेतल्यास Google Map च्या मदतीने तुम्ही पैसे कमावू शकता. गुगल पॉलिसी अंतर्गत व्यवसाय मालकाचा बिजनेस लिस्ट करण्यासाठी तुम्हाला त्याची मदत करावी लागेल. आणि त्याबदल्यात तो तुम्हाला काही रक्कम देईल. ही पद्धत चांगली ठरत असून अनेक तरुण याद्वारे चांगली कमाईही करत आहेत. अनेक तरुणांकडून Google Maps द्वारे 20 डॉलर ते 50 डॉलरपर्यंत कमाई केली जात आहे.
