Crime 24 Tass

Nagpur Crime | तुरुंगातच प्रकृती बिघडली, नागपूर मध्यवर्ती कारागृहातील दोन कैद्यांचा एकामागून एक मृत्यू

नागपूर : नागपूर मध्यवर्ती कारागृहातील (Nagpur Central Jail) दोन कैद्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
बाबुराव पंच आणि नरेंद्र राजेश वाहने या दोन कैद्यांचा अकस्मात मृत्यू झाला. 59 वर्षीय बाबुराव पंच अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची (Life Imprisonment) शिक्षा भोगत होता. तर 39 वर्षीय नरेंद्र राजेश वाहने एक कोटी 64 लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणात (Cheating) आरोपी होता. दोन्ही कैद्यांच्या मृत्यू प्रकरणी धंतोली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मात्र एका मागून एक दोघा कैद्यांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

कोण होते कैदी?

बाबुराव पंच याने नागपूरच्या कोतवाली परिसरातील एका अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप होता. या प्रकरणात त्याला कोतवाली पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. कोर्टाने त्याला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

2018 पासून बाबुराव नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. 23 फेब्रुवारीला त्याची प्रकृती अचानक बिघडली. त्याच्यावर मेडिकल रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्याचा शनिवारी मृत्यू झाला. या प्रकरणी धंतोली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

फसवणूक प्रकरणात अटक

दुसरीकडे, एक कोटी 64 लाखांची फसवणूक केल्या प्रकरणी मध्यवर्ती कारागृहात कैद असलेल्या 39 वर्षीय नरेंद्र राजेश वाहने (रा. आदिवासी सोसायटी, झिगाबाई टाकळी) याचाही मृत्यू झाला. प्रतापनगर ठाण्यात फसवणूक प्रकरणामध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी नरेंद्रसह त्याचा भाऊ विजय ऊर्फ नीलू राजेश वाहने यालाही अटक केली होती.

पोलीस कोठडी संपल्यानंतर दोघांचीही न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली होती. शुक्रवारी रात्री अचानक नरेंद्रची प्रकृती बिघडली. त्याला उपचारासाठी मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र शनिवारी उपचार सुरु असताना नरेंद्रने अखेरचा श्वास घेतला.

crime24tass
Author: crime24tass

Leave a Comment

[espro-slider id=28419]