Crime 24 Tass

पुणे हादरले! दहावीत शिकणाऱ्या मुलीवर धारदार शस्त्राने वार.

पुणे : पुण्यात एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. इयत्ता दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर वडगाव शेरी हद्दीत धारदार शस्त्राने वार करण्यात आले आहेत. एक तर्फी प्रेमातून ही घटना घडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ही खळबळजनक घटना वडगाव शेरी येथे घडली. आजूबाजूला असलेल्या लोकांनी तात्काळ या मुलीला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर वडगाव शेरी येथील सिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, दहावीच्या या विद्यार्थिनीवर २१ वर्षीय मुलाने शाळेच्या आवारातच चाकूहल्ला केला. विशेष म्हणजे मुलीवर वार केल्यानंतर आरोपीने विष प्राशन केले. सध्या दोघांनाही रुग्णालयात दाखल केले असून उपचार सुरु आहेत. पोलिसांना घटनेची माहिती मिळाली असून ते आवश्यक ती कार्यवाही करत आहेत.

crime24tass
Author: crime24tass

Leave a Comment

[espro-slider id=28419]