Crime 24 Tass

लातूरच्या लेकीचा देशात डंका; 21 व्या वर्षी यूपीएससीमध्ये मिळवले यश; बनली देशातील सर्वात लहान आयपीएस

लातूर : यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी अनेकजण आपल्या आयुष्याची महत्वपूर्ण वर्ष देत असतात. मात्र त्यात अनेकांना अपयश देखील येत. मात्र या सगळ्यात लातूरच्या लेकीने नुकताच यूपीएससीच्या परीक्षेत उत्तीर्ण होत देशात आपला डंका वाजवला आहे.
एवढंच नाही तर देशात सर्वात लहान आयपीएस बनण्याचा मान देखील या मुलीला मिळाला आहे.

यूपीएससी परीक्षेचा नुकताच निकाल लागला. त्यामध्ये महाराष्ट्रातील 100 हून अधिक विद्यार्थी यशस्वी झाले. मूळच्या लातूरच्या असणाऱ्या नीतिशा जगतापने पहिल्याच प्रयत्नात यूपीएससीमध्ये यश संपादन केलं असून तिची 199 रॅन्क आहे. महत्वाचं म्हणजे नीतिशा जगताप ही केवळ 21 वर्षाची आहे. त्यामुळे तिचे हे यश कौतुकास्पद आहे.

नीतिशा जगतापने पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून सायकॉलॉजी या विषयातून पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला. पदवीच्या दुसऱ्या वर्षापासूनच नीतिशाने यूपीएससीचा नियोजनबद्ध अभ्यास सुरु केला होता.नितिशाने आपली यूपीएससीची तयारी पुण्यात राहून केली. तिने युनिक अकॅडमीमधून मार्गदर्शन घेतल्याचे सांगितले.

सुरुवातीपासून नितिशा अभ्यासामध्ये हुशार असून तिला अभ्यास कर असं कधी सांगायची वेळ आली नसल्याचे नितिशाची आई अश्विनी जगताप यांनी सांगितले. नितिशाचे वडील संजय यांनीही नितिशा पहिल्या प्रयत्नात यशस्वी होणार असल्याचा विश्वास होता असे सांगितले.

नितिशाला अजून तरी सर्व्हिस अॅलॉट झाली नाही. पण आयएएस हे आपले पहिले प्राधान्य असल्याचं नितिशाने सांगितलं. या सर्व्हिसचा उपयोग गरजू लोकांच्या विकासासाठी करणार असल्याचं नितिशाने एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले.

केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. बिहारच्या शुभम कुमारने देशात पहिला येण्याचा मान मिळवला. या परीक्षेत महाराष्ट्रानेही आपली यशस्वी कामगिरी कायम ठेवली असून एकूण 761 उमेदवारांपैकी राज्यातील 100 हून अधिक उमदेवारांनी यश संपादन केले आहे. राज्यातून मृणाली जोशी हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे तर विनायक नरवाडे हा दूसऱ्या क्रमांकावर आहे. यूपीएससीतील गुणवत्ता यादीत या दोघांनी अनुक्रमे 36 आणि 37 वा क्रमांक पटकावला आहे.

crime24tass
Author: crime24tass

Leave a Comment

[espro-slider id=28419]