भंडारा : ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित खासदार क्रीडा महोत्सवात भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील तब्बल पाच हजारावर खेळाडूंनी सहभाग नोंदविला. क्रिकेट, कबड्डी, शंकरपट, नौकानयन, कुस्ती या स्पर्धा घेण्यात आल्या. आयोजक खासदार सुनील मेंढे कबड्डीच्या मैदानात प्रत्यक्ष उतरले आणि त्यांनी खेळाडूचा उत्साह वाढविला.
त्यांनी जोशात केलेल्या चढायाचे सर्वांनी टाळ्याच्या गजरात स्वागत केले. भंडारा येथील रेल्वे मैदानावर 26 फेब्रुवारी ते 13 मार्चपर्यंत खासदार क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री मा.नितीनजी गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. क्रिकेटच्या रणसंग्रामापासून ते ग्रामीण भागात लोकप्रिय शंकरपटापर्यंत सर्वच खेळांचा आनंद क्रीडाप्रेमींनी आणि खेळाडूंनी लुटला.

या खासदार क्रीडा महोत्सवात 351 संघ तसेच 5000 च्या वर खेळाडूनी सहभाग घेतला.
6 विधानसभा अंतर्गत घेण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेत 150 संघ सहभागी झाले होते. त्यात 2250 खेळाडूंनी सहभाग नोंदविला. कबड्डीच्या 126 संघात 1512 खेळाडू सहभागी झाले होते. माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर भंडारा जिल्ह्यातील शंकरपटाला नवजीवन मिळाले. सहा विधानसभा निहाय शंकरपटाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात 470 जोड्यांनी सहभाग नोंदविला.
लोकसभास्तरीय कुस्ती स्पर्धेत 66 पुरूष व 23 महिला असे 91 मल्ल सहभागी झाले होते. वैनगंगा नदीपात्रात नौकायन स्पर्धेत 48 खेळाडू सहभागी झाले होते. तर महिलांसाठी आयोजित लोकसभास्तरीय कबड्डी स्पर्धेत 08 संघ उतरले होते.
राज्यस्तरीय पुरूष कबड्डी स्पर्धेत 16 संघांनी भाग घेतला. रस्सीखेच स्पर्धेत पुरूषांचे 08 संघ, महिलांचे 11 संघ आणि क्रिकेट महासंग्रमामध्ये 32 संघ सहभागी झाले होते.
विविध खेळांची मेजवानी देणाऱ्या खासदार क्रिडा महोत्सवाची सांगता आज 13 मार्च रोजी झाली. दिल्लीचे खासदार आणि प्रसिद्ध गायक मनोज तिवारी यांची उपस्थिती भंडारा वासियांचे आकर्षण ठरली.
सांगता सोहळ्याचे प्रास्ताविक करताना खासदार सुनील मेंढे यांनी क्रीडा महोत्सवाने अनेक खेळाडूंची प्रतिभा पुढे आणण्यास मदत झाल्याचे सांगितले. यावेळी खासदार मनोज तिवारी यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना आणि संघांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. त्यापूर्वी शहीद संदीप भोंडे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

खेळ केवळ खेळ म्हणून नसून माणूस घडविण्याची व्यवस्था आहे. माणसाला माणूस म्हणून जगण्याची प्रेरणा खेळ देतात. सुदृढ माणूस घडविताना सशक्त देश घडविण्याचे काम खेळातून होत असल्याने खेळाला प्रोत्साहन देण्याचे काम देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी करीत असल्याचे सांगून क्रीडा महोत्सवासाठी खासदार सुनील मेंढे यांचे कौतुक केले. यावेळी तिवारी यांनी शहीद संदीप भोंडे यांच्यासाठी गीत गायले. इतरही काही गाण्यांनी तिवारी यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले.
यावेळी चित्रपट सृष्टीतील सिद्धार्थ दे पण प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ.उल्हास फडके, जिल्हाध्यक्ष शिवराम गिर्हेपुजे, मा.खा.शिशुपाल पटले, मा.आ.रामचंद्र अवसरे, मा.मुकेश थानथराटे, मा.प्रदीप पडोळे, मा.मोहन सूरकर, मा.बलवीरसिंग बिज, मा.रमेशभाई शहा, मा.सुनिल ओरा, मा.विजय पालीवाल, मा.जिवनचंद्र निर्वाण, मा.हेमंत हाडगांवकर, मा.हेमंत गांधी, सौ.अंजना पालीवाल, सौ.संध्या निर्वाण, मा.रुबी चढ्ढा, मा. आशु गोंडाणे, मा.विकास मदनकर, मा.मयूर बिसेन, मा.रामदास शहारे, मा.प्रशांत खोब्रागडे, मा.नितीन कडव, मा.रोशन काटेखाये, मा.तुषार काळबांधे,
मा.भूपेश तलमले, मा.चैतन्य उमाळकर, मा.अमित बिसने, मा.कैलाश तांडेकर, मा.मनोज बोरकर, मा.अविनाश ब्राम्हणकर, मा.प्रकाश कुर्झेकर, मा.कुणाल न्यायखोर, मा.अंकुश कळंबे, मा.राजेश टीचकुले, मा.विजय गभने, मा.शुभम चौधरी, मा.घनश्याम जांगळे, मा.शिव आजबले, मा.चेतन चेटूले, सौ.माला बगमारे, सौ.रोशनी पडोळे, सौ. साधना त्रिवेदी, सौ.वनिता कुथे, सौ.गिता सिडाम, सौ.झाशी गभने, सौ.चंद्रकला भोपे, सौ.भूमेश्वरी बोरकर, सौ.आशा उके, सौ.मंजिरी पनवेलकर, मधुरा मदनकर, व आदी उपस्थित होते.
खासदार उतरले कबड्डीच्या मैदानात
खासदार क्रीडा महोत्सवात कबड्डीचे सामने उत्कंठावर्धक झाले. प्रत्येक सामन्यात थरार शिगेला पोहचला होता. अशातच शनिवारी रात्री ९ वाजता एका सामन्यादरम्यान चक्क खासदार सुनील मेंढे उतरले. भंडाराविरूद्ध गोंदिया संघादरम्यान झालेल्या सामन्यात भंडाराचे प्रतिनिधीत्व केले. त्यांनी प्रतिस्पर्धी संघाचे तीन गडी बाद केले. एक उत्कृष्ठ कबड्डीपटू असल्याचे खासदार मेंढे यांनी यावेळी दाखवून दिले.
