भंडारा:- जिल्ह्यातील अड्याळ पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कलेवाडा शेतशिवारात शेकऱ्याचा मृतदेह आढळला. या शेतकऱ्याच्या डोक्यावर आणि गुप्तांगात जखम आढळून आल्याने खून केला असल्याचा संशय केला जात आहे.
सविस्तर असे की शनिवारी फिर्यादी ज्ञानदीप टेंभुरणे चे वडील मृतक नामे प्रदीप मंगल टेंभुर्णे वय (45) वर्ष रा. कलेवाडा हे नेहमी प्रमाणे आपले गावाचे बाहेर असलेले शेतावर मालाची जागली करण्यासाठी मचानावर गेले होते. परंतु ते आज रविवार सकाळी लवकर परत न आल्याने फिर्यादी यांनी त्यांचे शेतावर जाऊन बघितले असता मृतकाचे डोक्यावर व गुप्त अंगावर जखमा झालेल्या दिसल्या व रक्त आलेले दिसले म्हणून त्यास फिर्यादीने हलवून बघितले असता त्यांचे वडिलांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही म्हणून फिर्यादीचे वडील यास कोणीतरी अज्ञात इसमाने कोणत्यातरी कारणावरून त्यांचे डोक्यावर व गुप्त अंगावर वार करून जिवानिशी ठार केले फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून अज्ञात आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन अड्याळ येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
