Crime 24 Tass

दरोड्याच्या प्रयतनात असलेले सराइत गुन्हेगारांना प्राणघातक शस्त्र सह अटक

विशेष पथक प्रमुख विलास पाटील यांच्या टीम ची मोठी कारवाई

2 लोखंडी रिव्होलवर सदृश्य शस्त्र व 10 लोखंडी तलवार चाकू शस्त्र जप्त

प्रतिनिधी डॉ संजय चव्हाण

अकोला :- दि,22,03,22 रोजी मा पोलिस अधिक्षक जी श्रीधर सर यांच्या मार्गदर्शना खालील विशेष पथकास मिलालेल्या ख़बरेवरुन की चानदेकर चौक मधील बैंक ऑफ इंडिया समोर काही इसम हे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना रिवालवार ,पिस्तौल व तलवारी चां धाक दाखवून जबरी चोरी दरोडा घालनयाच्या तयारित आहेत त्यांच्ये जवळ प्राणघातक शस्त्रे ही आहेत अशा खात्रिशिर ख़बरेवरुन पंचा समक्ष छापा मारला असता 4 सराइत गुन्हेगार घटनास्थली रंगेहाथ मिळून आले त्यांच्ये जवळून 2 अग्निशस्त्र सारखे पिस्तौल ,रिवालवर, लोखंडी कट्टे ज्यात 06 जीवंत राउण्ड काडतुस सदृश्य दिसुन आलेत तसेच 10 प्राणघातक शस्त्र ज्यात 4 तलवार,कोयता,सूरी,चाकू,भाला,लोखंडी रॉड, 2 कत्ते, फायटर, तसेच नॉयलोंन दोरी, मिरची पूड, असे दरोडयाच्या तयारित असलेले चार अरोपि जागेवरच रंगेहाथ मिळून आलेत

त्यांच्यातील एक महिला साथीदार गर्दीचा फायदा घेवून लपुन निघुन गेली 4 अरोपितांची सराइत गुन्हेगारांची नावे 1)दीपक रामु अंभोरे वय 40 रा मुल्लानी चौक खदान 2) नितेश महादेव वाकोडे 44रमाबाई नगर 3) शुभम संजय गवई 20 रा इर।नि झोपड़पट्टी 4) अनिल दादाराव भालेराव वय 22 वर्ष रा HDFC बैंक समोर अकोला 5) फरार महिला ममता अनिल गवारगुरु 35 रा अकोटफाइल या अरोपिविरुद्ध दरोड़याची शस्त्रानिशि तयारी केल्याने पिस्तौल रिव्होलवार काडतुस सह विनापरवाना प्राणघातक शस्त्र सोबत बालगुन गुन्हा करतांना मिळून आल्याने व त्यांच्ये विरुद्ध अकोला शहरात शरीरा विरुद्ध व मालमत्ते विरुद्ध चोरी जबरीचोरी घरफोडी चे 22 गुन्हे वेगवेगड़े पोलिस स्टेशन येथे दाखल आहेत त्यावरून वरील अरोपिच्याविरुद्ध भादवी कलम 399, 402 कलमानवये पो स्टे सिटी कोतवाली येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

अरोपिताचे इतर साथीदार सरकारी दवाखान्यात HDFC चौकात आलेले असल्याची माहितीवरुन तेथे ही शोध घेण्याची कार्यवाही सुरु होती सदर कार्यवाही मा पोलिस अधिक्षक जी. श्रीधर ,अपर पोलिस अधिक्षक मोनीका राउत यांच्या मार्गदर्शना खाली पोलिस निरीक्षक विलास पाटील व त्यांच्या पथकाने केली.

crime24tass
Author: crime24tass

Leave a Comment

[espro-slider id=28419]