प्रशासनाने व्यक्त केले समाधान
भंडारा :- दि.23 जिल्हयात कोरोना संसर्गाची तिसरी लाट आता संपली असुन आज रोजी जिल्हयातील सातही तालुक्यात एकही कोविड पॉझिटिव्ह रुग्णाची नोंद आढळुन आली नाही. जिल्हयात सध्या एकही ॲक्टिव्ह रुग्ण नसुन गुरुवारला जिल्हयात 355 ॲन्टीजेन तर 68 आरटीपीसीआर असे एकुण 423 व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली त्यात एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळुन आले नाही. आज तारखेपर्यंत जिल्हयातील सातही तालुक्यात एकही ॲक्टिव्ह रुग्ण नसल्यामुळे प्रशासनाने समाधान व्यक्त केले आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत 98 हजार 366 व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली, त्यात 7 हजार 797 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळुन आले, त्यापैकी 7 हजार 789 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली असुन, 8 व्यक्तींचा मृत्यु झाल्याची नोंद आहे.
