Crime 24 Tass

27 ते 30 मार्च दरम्यान ऑनलाइन रोजगार मेळावा

फक्त ऑनलाईन नोंद करा, संधीचा लाभ घ्या

भंडारा :- स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त येत्या 27 ते 30 मार्च या तीन दिवसांच्या कालावधीत ऑनलाईन पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे त्याअनुषंगाने नामांकित कंपन्या आणि नियोक्तयांनी रिकत् पदांची नोंद कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता विभागाच्या http//www.rojgar.mahaswayam.gov.in या पोर्टलवर online job fair Bhandra-7येथुन आपल्या आवश्यकतेनुसार बेरोजगार उमेदवारांची उपलब्ध् असलेली यादी ऑनलाइन पध्दतीने प्राप्त् करावी.रोजगार मेळाव्यामध्ये
उच्च शिक्षित उमेदवारांपासून ते अशिक्षित उमेदवारांना रोजगाराच्या संधी प्राप्त होणार आहेत. तरी उमेदवारांनी मोझिला फायर किंवा गुगल क्रोम या ब्राऊजरचा वापर करून या विभागाचे वेबपोर्टल http//www.rojgar.mahaswayam.gov.in ओपन करावे. नोकरीसाठी म्हणून आपल्या युजरनेम व पासवर्डवरून लॉगीन करावे उमेदवारांनी यापूर्वी नोंदणी केली नसल्यास नोंदणी प्रक्रीया पूर्ण करावी. स्क्रिनवर डाव्याबाजूस दिसणाऱ्या पंडीत दीनदयाल उपाध्याय जॉब फेअर या टॅबमध्ये ऐच्छिक जिल्ह्याची निवड करून फिल्टर या पर्यायावर क्लिक करावे. स्क्रिनवर दिसणाऱ्या पर्यायापैकी व्हेकेंसी लिस्टींग या पर्यायावर क्लिक करून येणारा संदेश कळजी पुर्वक वाचावा व आय ॲग्री बटनावर क्लिक करावे. रोजगार मेळाव्यात पदांकरिता आवश्यक शैक्षणिक पात्रता, वय, अनुभव, कौशल्य यानुसार प्राधान्यक्रम निश्चित करून इच्छुक पदांना अप्लाय करावे.
उमेदवारांनी Mahaswayam App हे ॲप आपल्या स्मार्ट अँडरॉईड मोबाईल वर डाऊनलोड करून सुध्दा या सुविधांचा लाभ घेवू शकता. एका अर्थाने नोकरीच्या शोध आता आपल्या हाताच्या तळव्यावर उपलब्ध झालेला आहे.
रोजगार मेळाव्यासाठी कोणताही नोंदणी शुल्क नसून सदर मेळाव्यामध्ये मोफत सहभाग घेता येणार आहे. तरी सर्व आस्थापना व नोकरी ईच्छुक उमेदवारांना कळकळीची विनंती आहे की, त्यांनी या संधीचा फायदा घ्यावा . अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास कार्यालय 07184- 252250 या क्रमांकावर संपर्क करावा ,असे आवाहन योगेंद्र शेंडे सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र भंडारा यांनी केलेले आहे.

crime24tass
Author: crime24tass

Leave a Comment

[espro-slider id=28419]