भंडारा :- प्रधानमंत्री किसान सन्मान योजना अंतर्गत नोंदणी केलेल्या मात्र लाभ न मिळालेल्या लाभार्थ्यांचा डाटा दुरुस्त करण्यासाठी विशेष मोहीम 25 मार्च रोजी राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह सुरु असलेल्या शिबिरात जाऊन दुरुस्ती करून घ्यावी असे आवाहन खासदार सुनील मेंढे यांनी केले आहे.
25 मार्च रोजी राबविण्यात येत असून प्रधानमंत्री किसान सन्मान योजने अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती मात्र त्यांना लाभ मिळाला नाही अशा शेतकऱ्यांचा डाटा दुरुस्त करण्याच्या अनुषंगाने गावपातळीवर शिबिर घेण्याचा निर्णय शासनाने घेतला. 25 मार्च रोजी कार्यालयीन वेळेत स्थानिक ग्रामपंचायत किंवा तलाठी कार्यालयात हे शिबिर होणार आहे. शेतकऱ्यांनी आधार कार्ड, सातबारा आणि पासबुक प्रत घेऊन विशेष शिबिरात हजेरी लावावी आणि डाटा दुरुस्ती करून घ्यावा असे आवाहन खासदार सुनील मेंढे यांनी केले आहे.
