रमाबाई आंबेडकर वार्डातील अंगवाडीचे लोकार्पण
भंडारा : सकस आहार आणि योग्य संस्कार झाले तर बालकांचा सर्वांगिण विकास होतो. हेच काम अंगणवाड्यांच्या माध्यामातून केले जात आहे. देशाची भावीपिढी सुदृढ आणि संस्कारक्षम करण्याचे कार्य अंगणवाडीच्या माध्यमातून होत असून केंद्र सरकार या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करीत आहे, असे प्रतिपादन खासदार सुनील मेंढे यांनी केले.
नगर परिषद भंडारा प्रभाग क्र.10 येथे अंगणवाडी इमारत लोकार्पण व ई श्रम कार्डचे वाटप खासदार सुनील मेंढे यांच्या हस्ते पार पडले.
नगर परिषदचे माजी उपाध्यक्ष आशु गोंडाने यांच्या पुढाकाराने सूसज अंगवाडीचे लोकार्पण, आहार प्रदर्शनी व ई श्रम कार्ड वाटप होत आहे .
अंगणवाडीच्या माध्यमातून आज विविध उपक्रम राबविले जातात. त्यात अंगणवाडी ताईंंचे योगदान महत्वाचे आहे. त्या कठोर परिश्रम घेऊन मुलांना संस्कारक्षम करण्यासाठी झटत असतात. असे सांगत खासदार सुनील मेंढे यांनी अंगणवाडी ताईच्या कार्याचे कौतुक केले.
संस्कारा सोबतच सकर आहाराचे महत्व आहे. आज आधुनिकतेच्या नावाखाली आपल्या पुर्वजांनी तयार केलेली खाद्य संस्कृती आपण विसरत चाललो आहे. पिझ्झा बर्गरच्या मागे धावत आहेत. मात्र येथे लावलेल्या प्रदर्शनातील पदार्थ पाहून आपण भारावून गेलो. अंगणवाडीच्या माध्यमातून अशा खाद्या पदार्थांचे जतन होत असल्याने आपणास आनंद होत असल्याचे खासदार मेंढे यांनी सांगितले.

खासदार सुनील मेंढे यांच्या हस्ते ई – श्रम कार्डचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी मा.विनोदजी जाधव मुख्याधिकारी नगर परिषद भंडारा, मा.राहुल निपसे बाल विकास प्रकल्प अधिकारी भंडारा, मा.अर्जुन गोडबोले,मा.रुबीजी चड्डा मा.आशू गोंडाणे, मा.अनील गायधने,मा.ज्ञानेश्वर मुंदे लोकमत जिल्हा प्रतिनिधी,सौ.प्रीतीताई ब्राम्हणकर, मा.राजेश टिचकुले, सौ.शुभांगीताई खोब्रागडे, सौ.प्रीतीताई ब्राम्हणकर, मा.पपू खैरे,मा.भूपेश तलमले, मा तुषार इलमकर, अमोल शहारे, मा.सचिन कुंभलकर, मा.प्रशांत निंबोळकर, मा.अविनाश ब्राह्मणकर, मा.घनश्याम जांगळे, मा.लोकेश खोब्रागडे, मा शशिषी बड़ोले, धम्मा बड़ोले, मा.शैलेश जांभुळकर, मा.यशवंत नंदेश्वर, सौ.विद्या साखरे, सौ.साठवने मैडम आंगनवाड़ी सेविका आदी उपस्थित होते..
