Crime 24 Tass

उमरेड क-हांडल्यात आढळला ‘शॉडो’वाघिणीचा बछडा कुजलेल्या अवस्थेत

  • रानटी कुत्रे अथवा जंगली श्वापदांनी मारल्याचा अंदाज
  • पाच ते सहा दिवसापूर्वीची घटना

भंडरा:- उमरेड करहांडला व्याघ्र प्रकल्प पवनी वनपरिक्षेत्रात शॉडो नामक वाघिणीच्या एका ६ महिन्याच्या छाव्याचे शव कुजलेल्या अवस्थेत सापडले. पर्यटकांचे आकर्षण ठरलेल्या शॉडो वाघिणीला ३ शावक होते. शनिवारी २ एप्रिलला दोनच बछडे सफरीत दिसून आल्याने वन्यजीव विभागातर्फे शोध सुरू होता. सोमवार दि. ४ एप्रिलला सकाळी ९.३० च्या सुमारास एका बछड्याचे शव कुजलेल्या व अर्धवट वाळलेल्या अवस्थेत सापडले. मृत छाव्याच्या शरीरावर जखमेच्या खुणा असून ‘ढोले’ म्हणजेच रानटी कुत्रे किंवा दुसऱ्या एखाद्या हिंस्त्र श्वापदाने मारले असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.


घटनास्थळी पंचनामा करतेवेळी सीएफ श्रीमती श्रीलक्ष्मी अन्नपटूला, उमरेड-कहूंडला अभयारण्याचे उपवनसंरक्षक प्रमोद पंचभाई, गोरेगाव बचाव पथकाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सुजीत कोलंगत, डॉ. गुणवंत भडके , डॉ. विठ्ठल हटवार, वन्यजीव मानद रक्षक रोहीत तरूण नागपूर, शहिद खान भंडारा, नदीम खान भंडारा, अशासकीय संस्थेचे अजस्र हुसेन, मंगेश मस्के, सुभाष कोरे, तेजश पारशीवणीकर, नहिद खान उपस्थित होते. सदर छाव्याचा मृत्यू पाच ते सहा दिवसांपूर्वी झालेला असावा, असा अंदाज व्यक्त होत आहे.

crime24tass
Author: crime24tass

Leave a Comment

[espro-slider id=28419]