Crime 24 Tass

पदोन्नती द्या’ महसूल कर्मचाऱ्यांची एकमुखी मागणी

त्रिमूर्ती चौकात धरणे : जिल्ह्यातील ४०० कर्मचारी संपात सहभागी, कामकाज झाले प्रभावित

भंडारा : मागील दोन वर्षांपासून महसूल विभागातील अव्वल कारकून मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसीलदार संवर्गातील पदांची पदोन्नती मागील रखडलेली आहे. ती तातडीने पूर्ण करावी, यासह विविध मागण्यांना घेऊन महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आठवडाभरात पुन्हा दुसऱ्यांदा एक दिवसीय राज्यव्यापी आंदोलन केले. यात भंडारा जिल्ह्यातील लीपिकवर्गिय कर्मचाऱ्यांनी सहभाग घेत आंदोलन केले.

महसूल कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत. त्याबाबत कर्मचारी संघटांनी शासनाला अनेकदा निवेदने दिली. मात्र, सरकारकडून या मागण्यांची अजूनही पूर्तता करण्यात आली नाही. किंबहुना त्या सोडविण्याचा प्रयत्नही अद्याप करण्यासाठी कोणी पुढाकार घेतला नाही. त्यामुळे राज्यभरातील अव्वल कारकून व मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसीलदार यांनी आठवडाभरापूर्वी राज्यस्तरीय आंदोलन केले होते. यात भंडारा जिल्ह्यातील कर्मचारी सहभागी झाले होते.

पदोन्नतीचे प्रस्ताव मागील दोन वर्षांपासून मंत्रालयात प्रलंबित ठेवण्यात आले आहेत. हे प्रस्ताव तातडीने मार्गी लावावे अशी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेने मागणी केली आहे. या मागणीच्या पूर्ततेसाठी भंडारा जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला.

यामुळे आज दिवसभर तहसील कार्यालयातील कामकाज प्रभावित झाले. मागील आंदोलनात नायब तहसिलदार स्वतः उतरले होते. आजच्या आंदोलनातही नायब तहसीलदार, लिपिक, शिपाई प्रवर्गाचे महसुल विभागाचे जिल्ह्यातील ४०० अधिकारी आणि कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले होते. महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे भंडारा जिल्हा अध्यक्ष शिवशंकर साखरवाडे, सरचिटणीस संजय जांभूळकर, कोषाध्यक्ष किशोर राऊत, विलास चचाने, सरोज बनसोड, प्रशांत झाडे, आर. डी. चव्हाण, एकनाथ कातकड़े, शिल्पा डोंगरे आदींच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

crime24tass
Author: crime24tass

Leave a Comment

[espro-slider id=28419]