लाखनी : ओलंपिया जिम आणि संमिश्र ग्रुप लाखनी यांच्या वतीने रात्रकालीन रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या आयोजनाचे हे सलग सहावे वर्ष असून महिला व पुरुष अशा दोन गटांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. महिलांचे देखील अनेक संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते.
पुरूष गटात संमिश्र ग्रुप लाखनी, हार्डकोअर ए भंडारा निर्वाण मोहल्ला लाखनी, जय श्रीराम चंद्रपूर यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांक प्राप्त केला. महिला गटामध्ये मराठा
ग्रुप लाखनी यांनी प्रथम आणि ब्रास सिटी ग्रुप यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला. अंतिम सामना बघण्यासाठी आणि बक्षीस वितरण करण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार नाना पटोले उपस्थित होते. त्यांच्यासह पटोले उपस्थित होते. त्यांच्यासह
लाखनीच्या नगराध्यक्षा मनिषा पोहरकर, काँग्रेस पक्षाचे डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. चंद्रकांत निंबातें, माजी जि. प. सदस्य निंबातें, माजी जि. प. सदस्य आकाश कोरे, काँग्रेस तालुकाध्यक्ष राजू निर्वाण, पं. स. सदस्य अश्विनी मोहतुरे आदी उपस्थित होते.
भंडारा जिल्ह्यासह विविध • जिल्ह्यांमधील संघ या ठिकाणी सहभागी झाले होते. भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथील समर्थ मैदान येथे पार पडलेल्या या स्पर्धेस विविध संघ आणि स्पर्धक यांच्यासह नागरिक आणि क्रीडाप्रेमींची मोठी उपस्थिती होती. स्पर्धेसाठी सोनू फेंडरकर, गोलू निर्वाण, रमेश पारधीकर, सारंग खेडीकर, कृष्णा ठोसरे, संकेत खेडीकर, चेतन भिवगडे, निखिल गायधने, किशोर निर्वाण, विकास गभणे, सचिन खराबे, शेखर मेंढे, आकाश निंबेकर, गोपाल बावनकुळे, विकास हटेवार, मयूर निंबेकर, विठोबा भिवगडे, रोहित धरमसारे आदींनी सहकार्य केले.
