Crime 24 Tass

‘मृत्यू किती सुंदर आहे, करोना पुन्हा आल्यास मला मरायला आवडेल.

सुसाईड नोट लिहून १३ वर्षीय मुलीची आत्महत्या

नागपुर :- नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलीने मृत्यू सुंदर असून मला त्याचाशी मैत्री करायची आहे असे लिहून ठेवत आत्महत्या केली असल्याची घटना उघडकीस आली आहे.
आठवीच्या वर्गातील आर्याने गळफास घेऊन आपले आयुष्य संपवले आहे. ‘मृत्यू किती सुंदर आहे, मृत्यूला कवटाळायला मला आवडेल.डेथ इज गोल्ड.मृत्यूशी मला मैत्री करायची आहे’ अशा प्रकराचे वाक्य लिहून तिने आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना आज सोमवारी दुपारी उघडकीस आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्या हरिश्चंद्र मानकर असे मृत मुलीचे नाव आहे. हरिश्चंद्र मानकर हे व्हिएनआयटी महाविद्यालायात नोकरीवर आहेत. ते पत्नी, दोन मुली आणि एका मुलासह चंद्रमणीनगरात राहतात. मुलगा MSC तर मुलगी बारावीत आहे. लहान मुलगी आर्या ही माऊंट कारमेलमध्ये आठवीची विद्यार्थिनी होती.

आर्या अभ्यासात अत्यंत हुशार होती. तिला डायरी लिहिण्याची सवय होती. गेल्या काही महिन्यांपासून ती अबोल झाली होती. ती सारखी वहीमध्ये मृत्यूसंदर्भात अनेक विचारवंताचं सुभाषित लिहित होती. त्यासाठी आर्याने तीन वह्या तयार केल्या होत्या. त्यामध्ये तिने मृत्यूवर कविता लिहिली होती.

मृत्यू किती सुंदर आहे.यावर तिने आपले विचार मांडले होते. ‘जर करोना पुन्हा आला..तर मला मरायला आवडेल.’ असा उल्लेख तिने वहीत केला होता. सोमवारी सकाळी वडील नोकरीवर गेले तर आई स्वयंपाक करीत होती. बहिण ट्युशनला गेली होती. यावेळी आर्याने अभ्यासाच्या खोलीत जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली.

आई जेवायला आवाज देण्यासाठी खोलीत गेली असता तिला धक्का बसला. आईने हंबरडा फोडल्यानंतर शेजारी गोळा झाले. याप्रकरणी अजनीच्या सहायक पोलीस निरीक्षक शुभांगी माहोरे यांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. मात्र, अभ्यास हुशार असलेल्या आर्याच्या मृत्यूमुळे परीसरात हळहळ होती.

crime24tass
Author: crime24tass

Leave a Comment

[espro-slider id=28419]