Crime 24 Tass

भंडारा: वाघाच्या हल्ल्यात इसम ठार

▪ लाखांदूर तालुक्यातील इंदोरा जंगल परिसरातील घटना

▪ तालुक्यातील दुसरी घटना

लाखादूर : सकाळच्या सुमारास जंगलात मोहफुल वेचण्यासाठी गेलेल्या एका इसमावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना घडली. सदर घटना गत ५ एप्रिल रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास तालुक्यातील इंदोरा ते अरुणनगर मार्गावरील जंगल परिसरात उघडकीस आली आहे. जयपाल घोगलु कुंभरे (४०) रा इंदोरा असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या इसमाचे नाव आहे. वाघाच्या हल्ल्यात इसम ठार होण्याची ही लाखांदूर तालुक्यातील दुसरी घटना आहे.


प्राप्त माहितीनुसार, घटनेच्या दिवशी सकाळच्या सुमारास घटनेतील मृतक इंदोरा – अरुणनगर मार्गावरील जंगल परिसरात मोहफुल वेचण्यासाठी गेला होता. दरम्यान, जंगलातील एका झाडाखालील मोहफुले गोळा करून जंगलाबाहेर रस्त्यावर ठेवलेल्या सायकलवरील पिशवीत ठेऊन पुन्हा जंगलातील अन्य झाडाखालील मोहफुल वेचण्यासाठी गेला.

वाघाने मोहफुल वेचणाऱ्या ईसमावर अचानक हल्ला चढविला


यावेळी जंगलातील झुडपात शिकारीसाठी दबा धरून बसलेल्या एका वाघाने मोहफुल वेचणाऱ्या ईसमावर अचानक हल्ला चढविला. यावेळी वाघाने मृतकाला तब्बल २०० मीटर अंतरावर फरफटत ओढत नेत मृतकाचा ऊजवा पाय फस्त केला.
दरम्यान, सकाळच्या सुमारास मोहफुल वेचायला गेलेला मृतक ईसम दुपारी ऊशिरापर्यंत घरी न परतल्याने मृतकीच्या कुटुंबियांसह गावकऱ्यांनी जंगल परिसरात मृतकाच्या शोध घेतला असता मृतक इसमाचा जंगलात मृतदेह आढळून आला. यावेळी वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मोहफूल वेचण्यासाठी गेलेल्या इसमाचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करीत घटनेची माहिती स्थानिक लाखांदूर वन विभागासह पोलिस प्रशासनाला देण्यात आली.


माहितीवरून लाखांदूरचे वनपरिक्षेत्राधिकारी रुपेश गावित यांच्या मार्गदर्शनात क्षेत्र सहाय्यक आई जी निर्वाण, धर्मेंद्र केवट, वनरक्षक एम ए भजे, पी बी ढोले, आप एस भोगे, आर ए मेश्राम, डी एस झोडे, एम एस चांदेवार, एस ए नरवडे, पोलीस ऊपनिरीक्षक संदिप ताराम, पोलीस नाईक दुर्योधन वकेकार, पोलीस अंमलदार मनिष चव्हाण टेकचंद बुरडे यांसह अन्य वनाधिकारी व पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ जाऊन पंचनामा करीत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे.


दरम्यान, यापूर्वी तालुक्यातील दहेगाव जंगलात सरपण गोळा करण्यासाठी सकाळच्या सुमारास गेलेल्या एका ५४ वर्षीवर ईसमावर वाघाने हल्ला करुन ठार केले होते. तथापी, ५ एपरिल रोजी सकाळच्या सुमारास तालुक्यातील इंदोरा येथील जंगलात मोहफुल वेचायसाठी गेलेलिया एका ४० वर्षीय ईसमावर वाघाने हल्ला करुन ठार केल्याने तालुकयातील ही दुसरी घटना अल्याचे बोलले जात आहे.
तथापी, तालुक्यातील दोन भिन्न जंगल परीसरात दोन भिन्न ईसमांवर हल्ला चढवुन ठार केल्याने नरभक्षी ठरलेल्या वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी सर्वञ केली जात आहे.

crime24tass
Author: crime24tass

Leave a Comment

[espro-slider id=28419]