Crime 24 Tass

भंडारा: अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न फसला

दोघांना अटक : विनयभंग आणि पॉक्सो अंतर्गत कारवाई


भंडारा : शाळा सुटल्यानंतर ऑटोची वाट बघणाऱ्या अल्पवयीन मुलीला एकाने तिला भुलथाप देत बळजबरीने दुचाकीवर बसवून पळवून नेले. ही बाब मुलीच्या वडिलांच्या लक्षात येताच त्यांनी पाठलाग करून मुलीला पळविणाऱ्या युवकाला वाटेत पकडले. त्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी लाखनी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

अनिकेत किशोर शहारे (२०) आणि सूरज जिवतोडे (२२) दोघेही रा. रेंगेपार (कोहळी) ता. लाखनी असेल पोलिसांनी पॉक्सो अंतर्गत कारवाई करून अटक केलेल्या तरुणांची नावे आहेत. पीडित अल्पवयीन मुलगी ही १५ वर्षाची असून ती लाखनी तालुक्यातील पिंपळगाव (सडक) येथील आहे. शिक्षणासाठी ती दररोज लाखनी येथे शिकायला येते. गावातून ती शाळेत एकटीच येत असल्याने मागील आठ – दहा महिन्यापासून अनिकेत शहारे हा तिचा नेहमी पाठलाग करून तिला विक्षिप्त इशारे करीत होता. याबाबत मुलीने तिच्या वडिलांकडे सदर युवकाची तक्रार केली होती. मुलीच्या वडिलांनी सदर युवकाला अनेकदा समजविण्याचा प्रयत्न केला.


बुधवारला शाळा सुटल्यानंतर सदर अल्पवयीन मुलगी गावाला जाण्यासाठी ऑटो पकडण्याच्या हेतूने लाखनी येथील तहसील कार्यालयाजवळ पोहोचली. या संधी साधून सुरज जीवतोडे हा दुचाकीने तिच्याजवळ पोहचला. यावेळी त्याने अल्पवयीन मुलीला धमकी देत तिला बळजबरीने दुचाकीवर बसवून तिथून पळ काढला. दरम्यान, गावाजवळ उभ्या असलेल्या अल्पवयीन मुलीच्या वडिलांना त्यांच्या मुलीला कुणीतरी दुचाकीवरून पळवून नेत असल्याची बाब लक्षात येताच त्यांनी सदर दुचाकीचा पाठलाग करून युवकाला ताब्यात घेतले.
पीडितेच्या वडीलाच्या तक्रारीवरून लाखनी पोलिसांनी अनिकेत शहारे आणि सुरज जीवतोडे या दोघांविरुद्ध अल्पवयीन मुलीला पळवून नेने, तिचा विनयभंग करणे यासह पॉक्सो अंतर्गत कारवाई करत दोघांना अटक केली आहे.

crime24tass
Author: crime24tass

Leave a Comment

[espro-slider id=28419]