Crime 24 Tass

लाखांदूर तालुक्यात बर्निंग बाईकचा थरार

राज्य महामार्गावरील घटना


लाखांदुर :-वडसा ते लाखांदूर राज्य महामार्गावरून वडसा वरून लाखांदूर कडे येत असताना तालुक्यातील सोनी गावाजवळ बर्निंग बाईक थरार पाहावयास मिळाला. सदर घटना सहा एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील सोनी येथे घडली. या घटनेत जिवीतहानी झाली नसुन कैलास विठोबा चौधरी (३०) रा. पाऊणगाव असे दुचाकीचालकाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, तालुक्यातील पाऊनगाव येथील कैलास चौधरी यांनी गत सहा महिन्यापूर्वी इलेक्ट्रिक दुचाकी विकत घेतली होती. घटनेच्या दिवशी कैलास इलेक्ट्रिक दुचाकीने तालुक्यातील पाऊनगाव येथून काही खाजगी कामानिमित्त गडचिरोली जिल्ह्यातील वडसा येथे गेला होता.
दरम्यान, वडसा येथून कामकाज आटोपून सायंकाळच्या सुमारास ईलेक्ट्रीक दुचाकीने घरी परतत असताना वडसा ते लाखांदूर राज्य महामार्गावरील सोनी गावाजवळ इलेक्ट्रिक दुचाकीने अचानक पेट घेतला. दुचाकीने पेट घेतल्याचे लक्षात येताच कैलासने सदरची दुचाकी रस्त्यावरच ठेवून दुचाकी पासून वेगळा झाला. या घटनेत दुचाकी पूर्णतः जळून खाक झाली.
या घटनेत कुठलीही जीवित हानी झाली नसून या मार्गावरील प्रवाशांसह गावातील नागरिकांना बर्निंग बाईकचा थरार पहावयास मिळाल्याचे बोलल्या जात आहे.

crime24tass
Author: crime24tass

Leave a Comment

[espro-slider id=28419]