भंडारा : घराला कुलूप लावून सासरी जाणे एक व्यक्तीला चांगलेच महागात पडले असून घरी कुणी नसल्याची संधी साधून चोरट्याने घरातून दीड लाख रुपये किमतीचे दागिने लंपास केल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी शहरातील येथील तिलक वॉर्डात उघडकीस आली आहे।
मोहाडी येथील टिळक वॉर्डात राहुल रामप्रसाद धारगावे वय 41 हे घराला कुलूप लावून काही कामानिमित्त तुमसर येथे सासुरवाडीला गेले।सायंकाळी परत आले असता घराच्या समोरील दाराचे कुलूप तुटलेले दिसले।आत जाऊन बघितले तेव्हा बेडरूममधील कपाटातून दागिने चोरीस गेल्याचे लक्षात असून चोरट्यांनी सोन्याचे पदक, झुमके, नथ, तीन अंगठ्या व इतर दागिन्यांसह कपाटातील आठ हजार रुपये रोख असे तब्बल दीड लाख रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला होता।या प्रकरणी मोहाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, चोरट्यांचा शोध घेतला जात आहे।
