Crime 24 Tass

भंडारा येथील 2 नगरसेवक शिवसेनेत….मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्वागत..

प्रतिनिधी/भंडारा: भंडारा विधानसभा मतदार संघाचे कर्तबगार आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवून भंडारा नगर पालिकेचे 2 नगर सेवक शिवसेनेत सहभागी झालेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते वर्षा बंगल्यावर पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम घेण्यात आला.
भंडारा नगर पालिकेत 5 वर्षापूर्वी प्रभाग 14 मधून भाजपाच्या तिकीटावर निवडून आलेले नगरसेवक नितीन धकाते व प्रभाग 15 मधून अपक्ष निवडून आलेले व भाजपच्या समर्थनावर उपाध्यक्ष राहिलेले दिनेश (छोटू) भूरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला.


मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी दोन्ही नगरसेवकांनी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे व माजी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचा आशिर्वाद घेतला. आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळात जिल्हा प्रमुख अनिल गायधने, उपजिल्हा प्रमुख सुरेश धुर्वे यांनी यावेळी भंडारा विधानसभा मतदार संघातील विकास कामांविषयी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी सविस्तर चर्चा केली.


दीड-दोन महिन्यांपूर्वी पवनी नगर पालिकेतील 4 नगरसेवकांनी आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवून नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश केला होता. भंडारा नगर पालिकेतील 2 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे पक्षाची ताकद दिवसेंदिवस वाढत असून आणखी काही नगरसेवक संपर्कात असून लवकर ते शिवसेनेत दाखल होतील अशी माहिती जिल्हा प्रमुख अनिल गायधने व उपजिल्हा प्रमुख सुरेश धुर्वे यांनी दिली.

crime24tass
Author: crime24tass

Leave a Comment

[espro-slider id=28419]