आईला शिव्या दिल्या म्हणून मुलाने लाकड़ी दांडयाने वार करत वडिलांचा खून केल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील खराशी येथे घड़ली आहे. बाबुराव काहालकर वय 68 वर्षे असे मृतकाचे नाव असून मंगेश काहालकर वय 28 वर्ष असे आरोपी मुलाचे नाव आहे. ह्या प्रकरणी पालांदुर पोलिसांनी आरोपी मुलाविरुद्ध गुन्हा नोंद करुन अटक केली आहे.
आरोपी मंगेश हा आपल्या आई वडिलांसह राहत असून वडिलाचे दारूच्या नशेत मुलासोबत अनेकदा वाद व्हायचा. घटनेच्या दिवशी असेच मृतक बाबूराव याचे आपल्या पत्नी शी जोरदार भांडण झाले. यात वडिल आईला शिव्यादेत असल्याने रागाच्या भरात मंगेशने आपल्या वडिलांना लाकडी दांडयाने मारहाण केली. यात वडिल गंभीर जखमी झाल्याने त्याच्या जागेवर मृत्यु झाला. या घटनेत फिर्यादी आरोपीची आईच्या बयानावरुन पालांदूर पोलीस ठाण्यात कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला मुलाला अटक करण्यात आली आहे. या घटनेने खराशी गावात खळबळ उडाली आहे.
