Crime 24 Tass

खासदार सुनील मेंढे यांनी घेतली क्रीडा मंत्री ठाकूर यांची भेट

केंद्रीय सूचना व प्रसारण तथा क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांची भेट घेत खासदार सुनील मेंढे यांनी एक निवेदनही मंत्री महोदयांना देण्यात दिले. खासदार क्रीडा महोत्सवाचे आयोजन भंडारा – गोंदिया जिल्ह्यात करण्यात आले होते. याची माहिती देणारी पुस्तिका भेटी दरम्यान मंत्री मा.अनुराग ठाकूरजी यांना खासदार सुनील मेंढे यांनी दिली. या पुस्तकाचे अवलोकन करून मंत्रीमहोदयांनी आयोजनाचे कौतुक केले. भविष्यात असे आयोजनात सहभागी होण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. दरम्यान खासदारांनी त्यांना पुढील क्रीडा महोत्सवात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले.
यावेळी खासदारांसोबत मुंबई येथील चित्रपट उद्योगातील दिग्गज व ऑस्कर अकादमीचे सदस्य उज्ज्वल निरगुडकर उपस्थित होते. त्यांनी मंत्री महोदया समोर भारतीय उद्योगासाठी ऑस्कर पुरस्कार आणि तांत्रिक गोष्टींना प्रोत्साहन देण्याच्या अनुषंगाने एक प्रात्यक्षिक सादर केले. भारतीय सिनेमातील जास्तीत जास्त चित्रपटाचे नामांकन ऑस्करसाठी व्हावे हा यामागचा उद्देश होता.
हे प्रात्यक्षिक पाहिल्यानंतर अनुराग ठाकूर यांनी संबंधित विभागाला योग्य ती कारवाई करण्याच्या दृष्टीने सूचना केल्याची खासदार सुनील मेंढे यांनी सांगितले..

crime24tass
Author: crime24tass

Leave a Comment

[espro-slider id=28419]