भंडारा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार यांच्या मुंबई येथील सिल्व्हर ओक या निवास्थानावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने भंडारा येथे आज दि.९ एप्रिल रोजी निषेध नोंदवित हल्लेखोरा वर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. यावेळी भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला.
सिल्व्हर ओक वरील हल्ल्यातील मुख्य सूत्रधार अँड.गुणवंत सदावर्ते आणि १२५ आंदोलकांवर कठोर शिक्षा करण्यात यावी, महाराष्ट्राचे लोकनेते असलेल्या शरद पवार यांच्या घरावर अशा प्रकारे दगडफेक /चपलाफेक होणे हे अत्यंत निंदनीय कृत्य असून, काही राजकीय शक्तीनं कडून जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात असल्याचा आरोप भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस तर्फ यावेळी करण्यात आला. राज्यात राजकीय वातावरण खराब करण्यासाठी षडयंत्र केले गेले आहे .अशा दोषीवर तात्काळ कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणा भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे भंडारा जिल्हाधिकारी यांच्यामार्पâत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनातुन करण्यात आली.
मोच्र्यामध्ये जिल्ह्याध्यक्ष नाना पंचबुद्धे, प्रदेश महासचिव धनंजय दलाल ,डॉ.श्रीकांत वैरागडे, प्रभात गुप्ता, सरिताताई मदनकर,यशवंत सोनकुसरे, नरेंद्र झंझाड, हेमंत महाकाळकर,महेंद्र गडकरी , डॉ.रवींद्र वानखडे,सुनील साखरकर, जुगल भोंगडे, उमेश ठाकरे,राजू सलाम पटेल, विक्रम उजवणे, प्रदीप सुखदेवे, आरजु मेश्राम,रजनीश बन्सोड, आशा डोरले, कीर्ती गणवीर, प्रभाकर बोदेले, राहुल निर्वाण, नागेश भगत, रत्नमाला चेटूले, राजेश वासनिक, विक्की रावलानी,अश्विन बांगडकर, लोकेश नगरे, गणेश बानेवार, संजय लांजेवार, ईश्वर कळंबे, सुभाष तितिरमारे, रुपेश खवास, लोकेश खोब्रागडे, प्रभू फेंडेर,दयाराम निंबारते, गुड्डू हेडाऊ, संजय बोन्द्रे, प्रतीक मेश्राम, मंजुषा बुरडे,, कल्पना नवखरे, उत्तम कळपाते,विष्णू कडीखाये, महेंद्र बारापात्रे, राहुल वाघमारे,गणेश चौधरी,नरेश येवले, राजेश डोरले,रोशन वासनिक,प्रीती गोस्वामी,अनिल सुखदेवे, इम्रान शेख,हितेश सेलोकर, अरुण अंबादे,सोनू कानोजे, अमन मेश्राम, पियुष न्यायखोर, दयानंद नखाते, अनिल कळंबे, विकास पाठक,सारंग गभने, मयुरेश पंचबुद्धे,प्रणित वैरागडे, चेतन वैरागडे, व फार मोठया संख्येने शहर व ग्रामीण भागातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
