Crime 24 Tass

Gadchiroli | प्रेयसीची हत्या करुन मृतदेह पुरला, गडचिरोलीत माजी सरपंचाचा मुलगा गजाआड

गडचिरोली : प्रेयसीची हत्या करणारा (Girlfriend Murder) प्रियकर अखेर गजाआड झाला आहे.

अल्पवयीन मुलीची हत्या करुन प्रियकराने तिचा मृतदेह जमिनीत पुरला होता. गडचिरोली जिल्ह्यात (Gadchiroli Crime) हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. संबंधित युवती चार दिवसांपासून बेपत्ता होती. मात्र तिचा खून करुन मृतदेह जमिनीत पुरल्याचं समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु करत आरोपीच्या मुसक्या आवळल्या. आरोपी प्रियकर (Boyfriend) हा माजी सरपंचाचा मुलगा आहे. मोबाईल लोकेशनवरुन तपास करत पोलिसांनी आरोपी अविनाश मडावी याला तेलंगणात बेड्या ठोकल्या आहेत. मयत अल्पवयीवन मुलीसोबत अविनाशचे प्रेमसंबंध होते, मात्र त्याने नेमक्या कुठल्या कारणावरुन ही हत्या केली, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

काय आहे प्रकरण?

अल्पवयीन युवतीची हत्या करुन मृतदेह जमिनीत पुरणाऱ्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुक्यात मन्नेराजाराम लगतच्या गेर्रा येथील अल्पवयीन तरुणी गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता होती. नंतर तिचा मृतदेह जमिनीत पुरलेल्या अवस्थेत आढळला होता.

माजी सरपंचाचा मुलगा आरोपी

अल्पवयीन युवतीची हत्या करुन तिचा मृतदेह जमिनीत पुरलेला मृतदेह सापडल्यानंतर पोलीसांनी तपास सुरु केला. या प्रकरणात माजी सरपंचाचा मुलगा आरोपी आहे. त्यामुळे पोलिसांनी तपासासाठी तेलंगणात राज्यात टीम पाठवली होती.

तेलंगणातून प्रियकाराला अटक

अखेर मोबाईल लोकेशनवरुन पोलिसांनी आरोपी अविनाश मडावी याच्या मुसक्या आवळल्या. तेलंगणाच्या करीमनगर इथून प्रियकराला अटक करण्यात आली आहे.

हत्येचं कारण अस्पष्ट

आरोपी अविनाशचे मृत तरुणीशी प्रेम प्रकरण सुरु होते. मात्र ही हत्या नेमकी कोणत्या कारणावरुन करण्यात आली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

crime24tass
Author: crime24tass

Leave a Comment

[espro-slider id=28419]