Crime 24 Tass

Chandrapur Crime| भद्रावतीत सापडला होता मुंडकं नसलेला नग्नावस्थेतील युवतीचा मृतदेह

युवती रामटेकची असल्याची ओळख पटली

चंद्रपूर : भद्रावती येथे मुंडकं नसलेला आणि नग्नावस्थेत आढळलेल्या मुलीच्या मृतदेहाची ओळख पटली. स्थानिक गुन्हे शाखेच्या (Crime Branch) पथकाला मोठं यश आलंय. मृतक मुलगी नागपूर जिल्ह्यातल्या रामटेक येथील रहिवासी आहे.

गुडिया ( नाव बदललेलं. वय 22 वर्षे) असं मुलीचं नाव आहे. मयत मुलगी परिवारापासून वेगळी राहत असल्यामुळे तिच्या मिसिंगची कुठेही तक्रार नव्हती. मात्र पोलिसांनी खबरींच्या माध्यमातून मुलीची ओळख पटवली. मात्र मुलीच्या खुनाचे आरोपी, ठिकाण आणि उद्देश्याबाबत अजूनही खुलासा नाही. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरात (Bhadravati City) एका निर्घृण हत्येने खळबळ उडाली होती. नग्नावस्थेत असलेले डोकं छाटलेले एका युवतीचा मृतदेह सापडला होता. भद्रावतीच्या ITI मागील भागात ही घटना उघडकीस आली.

ओळख पटली, आरोपी कोण?

माहिती मिळाल्यावर भद्रावती पोलीस- फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. या युवतीचे डोके निर्दयपणे उडविल्याचे स्पष्ट होते. या घटनेनंतर पोलीस अधीक्षक स्वतः घटनास्थळी पोचले. या संवेदनशील घटनेच्या तपासासाठी पुराव्याची शोधमोहीम सुरू झाली. मृत युवती कोण? आणि आरोपी कुठले याबाबत अनभिज्ञता होती. ओळख पटविणे पोलिसांसमोर आव्हान होते. आता या युवतीची ओळख पटली आहे. परंतु, आरोपी शोधणे पोलिसांपुढे मोठे आव्हान आहे.

पोलिसांपुढं आव्हान

चंद्रपूर जिल्ह्यातील युवतीची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आलंय. या युवतीचे मुंडकं कापून नग्नावस्थेत तिला फेकून देण्यात आले होते. ती रामटेक येथील असल्याची तिची ओळख पटली आहे. आता आरोपींचा शोध लावणे पोलिसांसमोरील आव्हान आहे. वय वर्षे बावीस एकटी राहत होती. घरापासून दूर राहत असल्यानं तिच्याबद्दल काही कळू शकले नव्हते. ती मिसिंग असल्याची तक्रार कुणी केली नव्हती. एवढ्या निर्दयपणे तिला का मारले. याचा शोध आता पोलीस घेत आहेत. ही मुलगी रामटेकची असल्यानं आता रामटेक पोलीस युवतीचे मारेकरी शोधण्यात मदत करतील. या क्रूर घटनेने सारेच हादरले. आता आरोपींचा शोध लावण्याचे आव्हान पोलिसांपुढं आहे.

crime24tass
Author: crime24tass

Leave a Comment

[espro-slider id=28419]