भंडारा जिल्ह्याच्या लाखणी तालुक्यातील सोमलवाडा येथील 21 वर्षीय युवकाने स्वताच्या शेतात रस्सीच्या सहाय्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. क्रिष्णा शालिक अतकरी (21) रा.सोमलवाड़ा असे मृतकाचे नाव आहे. मृतक क्रिष्णा याचे त्याच्या गावातील अल्पवयीन मुली बरोबर प्रेम संबंध जुळले होते. याची माहिती मुलीच्या आईला होताच
मुलीच्या आईने क्रिष्णासोबत भांडण केले आता आपली बदनामी गावभर होणार असल्याची भीती बाळगून क्रिष्णा यांनी स्वतःच्या शेतात जाऊन झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेत आत्महत्या केली आहे. या आधी सुद्धा मृतकाने दोनदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. काल भांडण होताच रात्रभर घरी परत न आल्याने घरच्या लोकांनी सोधासोध केली मात्र क्रिष्णा दिसला नाही मात्र आज सकाळी गावातील एका व्यक्तीला मृत देह लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने याची माहिती लाखनी पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांनी घटनास्थळी पोहचत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविले आहे.
वर्धा: MPSC परीक्षेमध्ये यश मिळत नसल्याने वैफल्यग्रस्त झालेल्या 29 वर्षीय तरूणाची आत्महत्या
