भंडारा जिल्ह्याच्या साकोलीतील प्रकरण..
भंडारा न्यूज़
भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील एका पोलीस पाटलाने घराशेजारी राहणाऱ्या एका 13 वर्षीय अल्पवयीन बालिकेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली। संजय रामकृष्ण रामटेके वय 35 वर्ष असे या नराधम पोलीस पाटलाचे नाव आहे।घटनेची तक्रार साकोली पोलीस ठाण्यात करण्यात आली असून साकोली पोलिसांनी पोलिस पाटलाविरोधात गुन्हा नोंद केला आहे।
साकोली तालुक्यातील एका गावात रात्री बचत गटाची बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकी दरम्यान एका 13 वर्षीय बालिकेला पोलीस पाटलाकडून स्टॅम्प आणण्यासाठी पाठविले होते।मात्र, डाव पाहून व बालिका एकटीच घरी असल्याचे पाहून पोलीस पाटलाने विनयभंग केला, दुसऱ्या दिवशी सकाळी बालिकेने सर्व घडलेला प्रकार आपल्या सांगितला।लागलीच आई-वडिलांनी साकोली पोलीस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली आहे।साकोली पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता संजय रामटेके याच्यावर भादंवि 354 व पॉक्सोअंतर्गत गुन्ह्याची नोंद केली असून पोलिसांनी पोलीस पाटलाला अटक केली आहे।पुढील तपास पोलीस साकोली पोलिस करीत आहे।पोलिसांचा मदतगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोलीस पाटलानेच है कृत्य केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे।
