Crime 24 Tass

Gondia news ! देवरीतील अनाधिकृत मेडीकल लॅब वर देवरी पोलिसांची कार्यवाही…

श्री क्लिनीकल लेबॉरेटोरीतील मशिनरीसह चार लाखाचा मुद्देमाल…

जप्त पॅरावैद्यक कायद्यांतर्गत राज्यातील दुसऱ्या गुन्ह्याची नोंद

वैद्यक प्रयोगशाळा चालविण्यासाठी आवश्यक असलेली कोणतीही परवानगी नसताना गोंदिया जिल्हाच्या देवरी शहरातील मध्यभागी बिनधास्त सुरू असलेल्या श्री क्लिनिकल लॅबोरेटोरीवर काल सायंकाळी देवरी पोलिसांनी कार्यवाही करीत सुमारे 3 लाख 80 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी सदर प्रयोगशाळा संचालकाच्या विरुद्ध महाराष्ट्र पॅरावैद्यक परिषद 2011 च्या कलम 31 व 32 अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या कार्यवाहीमुळे गोंंदिया जिल्ह्यात बेकायदेशीर प्रयोगशाळा चालविणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. उल्लेखनीय म्हणजे पॅरावैद्यक कायद्यांतर्गत नोंदविलेला हा गुन्हा महाराष्ट्र राज्यातील दुसरा गुन्हा देवरीत दाखल झाल्याचे सांगितले जात आहे.

देवरी शहराच्या मध्यभागी असलेल्या कारगील चौकात भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील जितेश प्रेमलाल येळमे यांची श्री क्लिनिकल लेबोरेटोरी नावाची वैद्यक प्रयोगशाळा गेल्या काही वर्षापासून सुरू आहे. या संबंधीची माहीती मेडीकल लेबोरेटोरी टेक्नालॉजिस्ट असोशियन ऑफ महाराष्ट्र यांचे निदर्शनात आली असता त्यांनी सदर प्रयोगशाळेला भेट देवून तपासणी केली असता जितेश येळणे यांचेकडे सदर प्रयोगशाळा चालविण्यासाठी आवश्यक असलेले कोणतेही कागदपत्रे नसल्याचे दिसून आले. यांची तक्रार देवरी पोलिसात दाखल झाली असून सदर केंद्रावर धाड टाकून तपासणीसाठी वापरण्यात येणारी यंत्रे ताब्यात घेतली आहे. यामध्ये सुमारे 3 लाख किमतीची सीबीसी रोल काऊंटर मशिन आणि सुमारे 80 हजार रुपये किमतीची बॉयो केमिस्ट्री मशिन असा 3 लाख 80 हजार रुपये किमतीचा मुद्दमाल जप्त केला. देवरी पोलिसांच्या धड़क कारवाई अवैध प्रयोगशाला संचालकाचे दाबे दनानले आहे.

हे ही पाहा

पोलीस पाटलाने केला बालिकेचा विनयभंग…

https://gdnews9.dreamhosters.com/bhandara-polis-patlane-banana-girls-modesty/

crime24tass
Author: crime24tass

Leave a Comment

[espro-slider id=28419]