मानेगांव बाजार येथील घटना आरोपी कुटुंब अटकेत…
भंडारा: धक्कादायक!! गाईला रस्त्यावर धुने एका कुटुंबाला चांगलेच महागात पड़ले असून गाईला धुतल्यानंतर आपल्या आवारात पाणी आल्याच्या क्षुल्लक कारणाने झालेल्या भांडणात शेजाऱ्यांने दुसऱ्या शेजाऱ्यांची लाकड़ी दांडयाने वार करत हत्या केल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या कारधा पोलिस हद्दितिल मानेगांव बाजार येथे घडली आहे।ह्या प्रकरणी कारधा पोलिसात गुन्हा नोंद झाला असून आरोपी कुटुंबाला अटक करण्यात आली आहे।
प्रेमसंबंधातून 21 वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या… सोमलवाड़ा येथील घटना
मानेगांव बाजार येथील मते आणि बोंदरे कुटुंब शेजारी राहत असून त्याचे सुरुवाती पासून क्षुल्लक कारणामुळे वाद असून होता।काल संध्याकाळी महादेव बोंदरे हे आपल्या गाईला घरासमोरिल रस्त्यावर धुत होते।दरम्यान गाय धुत असतांना पानी मते यांच्या घरातिल आवारात आल्याने चंद्रशेखर मते यांनी महादेव बोंदरे यांच्याशी भांडन झाले झालेला वाद इतका विकोपाला गेला की चंद्रशेखर मते पति पत्नी आणि त्यांच्या दोन मूलांनी महादेव बोंदरे त्यांच्या पत्नी व मुलगा दिनेश ला लाकड़ी दंडयाने बेधम मारहाण केली।ह्यात बोंदरे कुटुंब गंभीर जखमी झाले।
Bhandara पोलीस पाटलाने केला बालिकेचा विनयभंग…
ह्याची माहिती कारधा पोलिसांना मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल होत पोलिसांनी जखमी बोंदरे कुटुंबाला उपचाराकरिता भंडारा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ह्या दरम्यान जखमी महादेव बोंदरे यांचे आज उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे।ह्या प्रकरणी कारधा पोलिसांनी आरोपी चंद्रशेखर मते व आरोपीची पत्नी व दोन मुलाविरुद्ध कलम 302,307,323 ,506 व 34 अन्वये गुन्हा नोंद करत चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे।ह्या घटने नंतर क्षुल्लक कारण किती मोठा विध्वंस घडवू शकतो याची प्रचिती मिळाली आहे।कारधा पोलिस पुढील तपास करीत आहे।
