Crime 24 Tass

Bhandara crime:तुमसर शहरात युवकाची निर्घुण हत्या

माकडे नगरातील घटना

तुमसर – नाश्ता करीत असताना काही अज्ञात हल्लेखोरांनी युवकाची धारदार शस्त्राने वार करीत हत्या केल्याची घटना आज दिनांक 12 एप्रिल ला सायंकाळी 5.30 च्या सुमारास माकडे नगरांमध्ये घडली मोदग्लायण ऊर्फ मोनू विनू गेडाम वय (27) राहणार आंबेडकर वार्ड तुमसर असे मृतक युवकाचे नाव असून मारेकरी फरार झाले.

सविस्तर वृत्त असे की मृतक युवक हा व्यवसायाने टॅटू बनविणे व स्वतःची सलून चालवत होता आज सायंकाळी दुकान सुरू करण्यासाठी दुकाना जवळ आला आणि नाश्ता करण्यासाठी दुसऱ्या दुकानात गेला पण नाश्ता करता-करता ची अज्ञात हल्लेखोरांनी डोळ्यामध्ये मिरची पूड टाकून पाठीवर व मानेवर धारदार शस्त्राच्या वार केले कसातरी आपला जीव वाचवीत मोदग्लायण माकडे नगरातील गल्लीमध्ये पळत असताना काही मारेकरी विरुद्ध दिशेने येऊन पुन्हा वार करीत पसार झाले रक्ताच्या थारोळ्यात मोदग्लायण तिथेच तडपत मृत्यू पावला सदर घटनेची माहिती तुमसर पोलिसांना मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला.
आज तुमसर शहरातील मार्केट असल्यामुळे रस्त्यावर नागरिकांची चांगलीच गर्दी होती परंतु सायंकाळच्या भर उजेडात नागरिकांसमोर शास्त्राच्या धारधार हल्ला झाल्याने शहरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे
मृतक मोदग्लायण हा माकडे नगराच्या जवळच एका कॉम्प्लेक्समध्ये काही दिवस आधीच टॅटू काढणे व सलून ची दुकान लावली होती परंतु अचानक झालेल्या हल्ल्याने परिसरातील वातावरण भितीदायक झाले आहे वृत्त लिहीपर्यंत पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करीत शव हा उपजिल्हा रुग्णालय तुमसर येथे पोस्टमार्टम करिता पाठविण्यात आले सध्या तुमसर पोलिसांनी अज्ञात विरुद्ध कारवाई करणे सुरू केले असून अज्ञात आरोपींना शोध घेणे सुरू आहे रात्रीपर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही घटनास्थळी तुमसर चे ठाणेदार नितीन चिंचोळकर व पोलिसांसह दाखल झाले होते

crime24tass
Author: crime24tass

Leave a Comment

[espro-slider id=28419]