Crime 24 Tass

Bhandara : झुंजीत जखमी झालेल्या बिबट्याचे रेस्क्यू

उपचारासाठी गोरेवाडा केंद्रात हलविले

भंडारा : दोन बिबट्यामध्ये झालेल्या झुंजीत एक एक बिबट गंभीर जखमी झाला. या बिबट्याचे रेस्क्यू करून पिंजऱ्यात बंद केले. औषधोपचार करण्यासाठी त्याला नागपूर येथील गोरेवाडा रेस्क्यू सेंटरला हलविले आहे.
ही घटना साकोली वन विभागाअंतर्गत येणाऱ्या शिरेगाव बांध परिक्षेत्रात घडली. नवेगाव बांध अभयारण्या लगत असलेल्या या घटनास्थळावर बिबट रस्त्यावरील पुलाखाली पाइपमध्ये असल्याची माहिती गोंदिया येथील आर आर यु पथकाला मिळाली. पथकाने घटनास्थळ गाठले. यावेळी सदर बिबट गंभीर जखमी असल्याची बाब समोर आली. याची माहिती आरआरयू पथकाने साकोलीचे सहाय्यक वनसंरक्षक रोशन राठोड यांना दिली.

माहिती मिळताच राठोड हे आपल्या वन कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. यावेळी राठोड यांनी गंभीर बिबट्याचे रेस्क्यू करण्यासाठी उप वनसंरक्षक राहुल गवई यांची परवानगी घेत वन कर्मचार्‍यांच्या मदतीने बिबट्याला पिंजऱ्यात अडकविले. त्याची पाहणी केली असता बिबट्या गंभीर जखमी असल्याचे दिसून आले. सदर रेस्क्यू पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनात गंभीर बिबट्याला पुढील उपचारासाठी नागपूर येथील गोरेवाडा रेस्क्यू सेंटरला आहे पाठविले आहे.

crime24tass
Author: crime24tass

Leave a Comment

[espro-slider id=28419]