भंडारा : जिल्ह्याच्या नजरा लागून असलेल्या बहुप्रतीक्षित पंचायत समिती पदाचे आरक्षण येत्या शुक्रवारी सभापती पदाचे आरक्षण सोडत जाहीर होत आहे या आरक्षण सोडतीवर सर्वच राजकीय पक्षांच्या नजरा असून सत्ता स्थापनेचा मर्ग मोकळा होणार आहे. या सोडती नंतर खऱ्या अर्थाने मागील अडीच महिन्या पासून शांत असलेले राजकीय वातावरण आता ढवळून निघणार आहे. किंबहुना सभापतीपद आपल्याच पक्षात राहावे यासाठी घोडेबाजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सभापतीपदाचे आरक्षण कोणासाठी व कोणत्या पक्षासाठी लाभदायक ठरेल हे शुक्रवारी निश्चित होईल.
जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती पदाकरिता अडीच वर्षाच्या कालावधीसाठी आरक्षित पदाची सोडत 22 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा नियोजन सभागृहात होणार आहे. तरी या सोडतीसाठी जिल्ह्यातील मान्यता प्राप्त राजकीय पक्षाचे प्रतिनिधी, नवनिर्वाचित जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती सदस्य व इच्छुक सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी कळवले आहे.
