Crime 24 Tass

Nagpur : चालकाचे हातपाय बांधून ट्रक पळविला; नागपूर – भंडारा महामार्गावरील घटना

माैदा (नागपूर) : अनाेळखी चाैघांनी ट्रकच्या केबिनमध्ये प्रवेश करीत चालकास मारहाण केली आणि त्याचे हातपाय बांधून ट्रक व त्यातील साहित्य चाेरून नेले. यात चाेरट्यांनी एकूण १३ लाख १२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चाेरून नेला, अशी माहिती ठाणेदार हेमंतकुमार खराबे यांनी दिली.
ही घटना माेदा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-भंडारा राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी (दि. १६) मध्यरात्री १.१५ वाजताच्या सुमारास घडली.

ट्रकचालक अक्षय वामनराव शिनपुरे (वय २६, रा. रामेश्वरी, नागपूर) हा एमएच-४०/व्हीएल-७३५० क्रमांकाच्या ट्रकमध्ये ५.५ टन रसायन आणि ३.५ टन इतर साहित्य घेऊन नागपूरहून अंबिकापूर (छत्तीसगड) येथे जाण्यासाठी निघाला हाेता. त्याने नागपूर-भंडारा महामार्गावरील महालगाव (ता. कामठी) शिवारात राेडलगत ट्रक थांबविला आणि टायर चेक करून झाेप येत असल्याने केबिनमध्ये माेबाईल बघत बसला हाेता.

Bhandara crime:जुन्या वादातून आमगावात घडला तरुणाच्या निर्घृण हत्येचा थरार

दरम्यान, अनाेळखी चाैघे ट्रकच्या केबिनमध्ये शिरले. त्यांनी चेहऱ्याला दुपट्टा बांधलेला हाेता. त्या चाैघांनीही अक्षयला मारहाण करीत डिझेल कितना है, अशी विचारणा केली. त्यातच एकाने फाेनवर कुणाला तरी हम निकल रहे है, असे सांगितले. त्यांनी अक्षयचे हातपाय बांधून त्याला सीटखाली दाबले. त्याच्याकडील १० हजार रुपयांचा माेबाईल फाेन व डिक्कीतीन दाेन हजार रुपये हिसकावून घेतले. त्यांनी अक्षयला मालाची बिल्टी व पैशांबाबत विचारणा केली. त्यानंतर चाैघांनी त्याला मध्येच ट्रकखाली ढकलून देत ट्रक घेऊन पळू गेले.

यात चाेरट्यांनी एकूण १३ लाख १२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चाेरून नेल्याचे त्याने पाेलिसांना सांगितले. याप्रकरणी माैदा पाेलिसांनी त्याच्या तक्रारीवरून चाैघांविरुद्ध भादंवि ३९४, ३६३, ३४ अन्वये गुन्हा नाेंदविला. या घटनेचा तपास सहायक पाेलीस निरीक्षक साेनेकर करीत आहेत.

भंडारा : धावत्या बसमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार, तरुणास अटक

crime24tass
Author: crime24tass

Leave a Comment

[espro-slider id=28419]