Crime 24 Tass

एस.टी.महामंडळातील कर्मचारी कामावर परतण्यास सुरुवात,

एका दिवसांत 15 हजार 185 कर्मचारी हजर

ST Workers Strike : एसटी महामंडळातील कर्मचारी कामावर परतण्यास सुरुवात झाली आहे. सोमवारी एका दिवसांत एसटी महामंडळातील 15 हजार 185 कर्मचारी हजर असल्याची माहिती मिळत आहे.
ऑक्टोबर, 2021 च्या शेवटच्या आठवड्यापासून एसटी कर्मचारी संपावर आहेत. एसटी महामंडळाच्या सर्व कर्मचार्‍यांचे राज्य शासनात विलगीकरण करण्याच्या मागणीसाठी हा संप पुकारण्यात आला होता.

पुढील चार दिवसांत एसटी पूर्ण क्षमतेने सुरू होईल


एसटी महामंडळातील कर्मचारी कामावर परतण्यास सुरुवात झाली आहे. पुढील चार दिवसांत एसटी पूर्ण क्षमतेने सुरू होईल असा एसटी प्रशासनाला विश्वास आहे. तर नव्याने हजर होणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना एक दिवसाचे जुजबी प्रशिक्षण देण्यात येणारं असे परिवहन मंडळाकडून सांगण्यात आले आहे.

एका दिवसांत 15 हजार 185 कर्मचारी हजर

सोमवारी एका दिवसांत एसटी महामंडळातील 15 हजार 185 कर्मचारी हजर होते, मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 82 हजार 108 कर्मचाऱ्यांपैकी 61 हजार 647 कर्मचारी कामावर हजर आहेत, तर 20 हजार 461 कर्मचारी कामावर अद्याप बाकी आहेत. प्रशासकीय 12 हजार 6, कार्यशाळा 15 हजार 781, चालक 29 हजार 485 तर वाहक 24 हजार 826 कर्मचारी हजर आहेत.

22 एप्रिलची डेडलाइन


ऑक्टोबर, 2021 च्या शेवटच्या आठवड्यापासून एसटी कर्मचारी संपावर आहेत. एसटी महामंडळाच्या सर्व कर्मचार्‍यांचे शासनात विलगीकरण करण्याच्या मागणीसाठी हा संप पुकारण्यात आला होता. महामंडळाने कर्मचार्‍यांच्या काही मागण्या मान्य केल्या. मात्र, त्याला न जुमानता कर्मचारी संपावर ठाम होते. अखेर उच्च न्यायालयाने दखल घेऊन कर्मचार्‍यांनी 22 एप्रिलपर्यंत कामावर येण्यास सांगितले. ज्यांच्या विरोधात बडतर्फी, निलंबन अथवा अन्य कारवाया सुरू असतील, त्या मागे घेऊन समज देऊन त्यांना कामावर घेऊ.

मात्र, 22 तारखेनंतर जे कर्मचारी कामावर येणार नाहीत, त्यांना नोकरीची गरज नाही, असे समजून त्यांची सेवा समाप्त केली जाईल, असे परिवहनमंत्र्यांनी सांगितलंय. एसटी महामंडळाने संपातील कर्मचार्‍यांना कामावर हजर होण्यासाठी आतापर्यंत सात वेळा संधी दिली. मात्र, या काळात 30 टक्केही कर्मचारी हजर होऊ शकले नाहीत. आता न्यायालयानेच 22 एप्रिलची डेडलाइन दिली आहे. तोपर्यंत हजर झाले, तर कारवाई होणार नाही. मात्र, त्यानंतर हजर होण्याची संधी मिळणार नाही.

महत्वाच्या बातम्या :

Nagpur : चालकाचे हातपाय बांधून ट्रक पळविला; नागपूर – भंडारा महामार्गावरील घटना

Bhandara crime:जुन्या वादातून आमगावात घडला तरुणाच्या निर्घृण हत्येचा थरार

भंडारा : धावत्या बसमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार, तरुणास अटक

crime24tass
Author: crime24tass

Leave a Comment

[espro-slider id=28419]