अपघातात काकुचा मृत्यू,पुतण्या गंभीर
उमरेड-भिवापुर महामार्गावरिल घटना
नागपूर येथे शिकणा-या मुलीची भेट घेत रात्रीचे सुमारास खाजगी चारचाकी वाहनाने पुतण्यासह स्वगावी परतत असतांना झालेल्या अपघातात काकुचा जागीच मृत्यू तर पुतण्या गंभीररित्या जखमी झाल्याची घटना घडली. सदर अपघात गत 17 एप्रिल रोजी रात्री 10 वाजताचे सुमारास उमरेड-भिवापुर राज्यमहामार्गावर घडली. या घटनेत बारव्हा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ अस्मिता अशोक नंदेश्वर (57) नामक काकुचा जागीच मृत्यू तर सुमीत दौलत नंदेश्वर (32) रा. बारव्हा नामक पुतण्या गंभीर रित्या जखमी झाला आहे.
प्राप्त माहिती नुसार, घटनेच्या दिवशी सकाळच्या सुमारास घटनेतील मृतक डॉक्टर काकू व जखमी वाहन चालक पुतण्या मालकी बेलेनो गाडी क्र. एम एच 36एच 8298 ने नागपूर येथे शिकणा-या मुलीच्या भेटीसाठी गेले होते. दरम्यान दिवसाच्या सुमारास नागपूर येथे शिकणा-या मुलीची भेट घेत रात्रिच्या सुमारास मालकी वाहनाने स्वगावी बारव्हा येथे परतत असतांना उमरेड – भिवापुर महामार्गावर रस्त्याच्या कडेला उभ्या ट्रकला मृतकाच्या मालकी वाहनाने धडक दिली.
तथापि, ट्रकला मृतकाच्या मालकी वाहनाची धडक लागताच सबंधित वाहन भर रस्त्यावर आडवे झाले. अशातच पाठीमागुन भरधाव वेगाने धावणा-या अन्य एका वाहनाने भर रस्त्यावर आडवे झालेल्या मृतकाचे वाहनाला जबर धडक दिली. दरम्यान, मृतकाच्या एकाच वाहनाला दोन अन्य वाहनांची तब्बल दोनदा धडक झाल्याने वाहनचालक पुतण्या गंभीररित्या जखमी झाला तर वाहन मालक काकुचा जागीच मृत्यू झाला.
सद्या गंभीर जखमी वाहन चालकावर नागपूर येथे वैद्यकीय उपचार सुरु असल्याची माहिती देण्यात आली आहे. सदर घटनेची माहिती रात्री उशिरापर्यंत मृतकाचे कुटुंबियांसह परिसरातील नागरिकांना होताच परिसरात सर्वत्र दु:ख व्यक्त केल्या जात आहे.
महत्वाच्या बातम्या :
Nagpur : चालकाचे हातपाय बांधून ट्रक पळविला; नागपूर – भंडारा महामार्गावरील घटना
Bhandara crime:जुन्या वादातून आमगावात घडला तरुणाच्या निर्घृण हत्येचा थरार
भंडारा : धावत्या बसमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार, तरुणास अटक
एस.टी.महामंडळातील कर्मचारी कामावर परतण्यास सुरुवात,
