Crime 24 Tass

Bhandara crime : आंधळगावात अल्पवयीन मुलीचा विनयभंग

पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

भंडारा : घरी अल्पवयीन मुलगी एकटीच असल्याची संधीसाधून एका इसमाने तिचा विनयभंग केला. याप्रकरणी आंधळगाव पोलिसांनी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
गौतम अरविंद लोणारे रा. वायगाव ता. मौदा जि. नागपूर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौतम हा मोहाडी तालुक्यातील आंधळगाव येथे अल्पवयीन मुलीच्या घरी १९ एप्रिलला आला होता. यावेळी अल्पवयीन मुलगी घरी एकटीच असल्याची संधीसाधून सदर इसमाने तिचा विनयभंग केला.
पीडित मुलीने घडलेली हकीकत कुटुंबीयांना सांगितली. पालकाच्या तक्रारीवरून आंधळगाव पोलिसांनी गौतमविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा अधिक तपास जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, उपअधीक्षक (गृह) विजय डोळस, उपविभागीय पोलिस अधिकारी बिसेन, पोलिस निरीक्षक शिरभाते यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक गणेश पदवाड अधिक तपास करीत आहे.

महत्वाच्या बातम्या

Bhandara crime:आमगाव येथील हत्येप्रकरणी आणखी सात जणांना अटक

Nagpur : खाजगी चारचाकी वाहनाला अपघात

Nagpur crime :नवजात बाळ विक्रीतील पैशातून पित्याचा ‘ऐषआराम’; दुचाकी, मोबाईल आणि दिवान खरेदी

Gondia crime:धक्कादायक महादेव पहाडी जंगल परिसरात आढळला तरुणीचा मृतदेह

crime24tass
Author: crime24tass

Leave a Comment

[espro-slider id=28419]