प्रतिनिधी/भंडारा : जय जवान जय किसान संघटनेचे जिल्हाध्यक्ष वसीम (टिंकू) खान, पटेलपूरा वार्डातील समासेवक व सद्भावना शारदा मंडळाचे अध्यक्ष राजीव देसाई आणि भाजपाच्या माजी नगरसेविका शमीमा अजीज शेख या तीन प्रमुख नेतयांनी त्यांच्या असंख्य समर्थकांसह आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज शिवसेनेत प्रवेश केला.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वावरील महाविकास आघाडी सरकारच्या कार्यपध्दतीमुळे प्रभावीत होऊन स्थानिक धडाडीचे, कर्तव्यनिष्ठ आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या विकासवादी दृष्टीकोनाला पाठींबा देण्यासाठी शिवसेनेत प्रवेश केल्याची प्रतिक्रिया या नेत्यांनी केली. येणा-या न.प. निवडणूकीत आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात जिल्हाप्रमुख अनिल गायधने, उपजिल्हाप्रमुख सुरेश धुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली न.प. वर निश्चित भगवा फडकविणार असून यापुढेही असंख्य कार्यकर्ते शिवसेनेत येण्यास इच्छूक असल्याचे या नेत्यांनी सांगितले.
शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल गायधने, उपजिल्हा प्रमुख सुरेश धुर्वे, शहर प्रमुख मनोज साकोरे, अल्संख्यांक आघाडी जिल्हा प्रमुख आरिफ शेख आदी यावेळी उपस्थित होते.
भाजपाच्या माजी नगरसेविका शमीमा अख्तरी अजीज शेख, भाजपचे अल्पसंख्यांक सेलचे कार्यकर्ता अजिज शेख, जय जवान जय किसान संघटनेचे जिल्हाध्यक्ष वसिम (टिंकू) खान, स्विजर खान, जावेद शेख, सुफीयान शेख, अनिस शेख, फराज खान, बांधकाम कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितेश मारवाडे, आर्यन बागडे, रिजवान चव्हाण, मन्नू खान, बबलू शेख, शाकीर चव्हाण, रजा शेख, बिलाल सैय्यद, गूड्डू खान, अफसाना शकील शेख, अंजुम खान, राजू देसाई, रजनी देसाई आदींनी यावेळी शिवसेनेत प्रवेश केला.
