भंडारा: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालय द्वारा देशभर आरोग्य मेळाव्याचे आयोजन केले जात आहे. साकोली येथे अशाच आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन खासदार सुनील मेंढे यांच्या हस्ते झाले.
साकोली उपजिल्हा रुग्णालयात झालेल्या मेळाव्यात अनेक नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. आवश्यक यांना शल्यचिकित्सा सुचविण्यात आली. आरोग्य मेळाव्याच्या माध्यमातून समाजाचे आरोग्य सुदृढ ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. याप्रसंगी बोलताना खा.मेंढे यांनी केंद्रसरकार कोरोना काळात प्रत्येक भारतीयाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली असे सांगितले. मात्र अजूनही ग्रामीण भागात आजारांबद्दल जागृती नाही असे ते म्हणाले, उपजिल्हा रुग्णालय असूनही अनेकदा रुग्णांना जिल्ह्याच्या ठिकाणी पाठवण्याचा प्रयत्न होतो. मात्र सोयी-सुविधा असताना त्याचा रुग्णांना देण्याचा प्रयत्न स्थानिक पातळीवर करायला हवा असे आवाहन खासदारांनी डॉक्टरांना केले. कोरोना काळातील सेवेसाठी आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी कौतुकास पात्र असल्याचे खा.मेंढे म्हणाले.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक फारुकी, जिल्हा आरोग्य अधिकारी सोमकुवर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष शिवराम गिरेपुंजे, मा.आ.हेमकृष्ण कापगते, पोलिस निरीक्षक जितेंद्र बोरकर, मा.प्रकाश बाळबुधे,वैद्यकिय अधिक्षक डॉ.संदीपकुमार गजभिये, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राकेश नंदेश्वर, जि.प. सदस्य मदन रामटेके, महेश्वरी नेवारे, मा.वनिता डोये, मा, रेखा भाजीपाले, मा.धनवंता राऊत, मा.जगन ऊईके, मा.लखन बर्वे, मा.हरगोविंद भेंडारकर, मा.उषा डोंगरवार, अॅड मनीष कापगते, प.स. सदस्य सौ.करंजेकर, डॉ.संतोष गाडगे, डॉ.दीपक चंदवाणी, डॉ.भास्कर गायधने, डॉ.रुपेश बडबाईक, डॉ.राजेश चंदवाणी, डॉ.तारकेश्वर लंजे व अन्य उपस्थित होते.
