Crime 24 Tass

मोबाईल रिचार्जचे दर पुन्हा वाढणार; मोबाईल कंपन्यांनी सुरु केली तयारी

नवी दिल्ली: अगोदरच इंधन (Petrol) दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. आता मोबाईल (Mobile) रिचार्जचे दर पुन्हा महागणार आहेत.

मोबाईल कंपन्यांनी याअगोदरही दरवाढ केली होती. रिचार्ज पॅकचे दर पुन्हा बदलण्याची तयारी कंपन्यांनी सुरु केली आहे. त्यामुळे मोबाईल डाटा आणि कॉलचे दर वाढणार आहेत. जे ग्राहक सीम वापरत नाहीत, त्या ग्राहकांवर मोबाईल कंपन्यांचे विशेष लक्ष आहे. जे ग्राहक सीम वापरत नाहीत तो नंबर बंद करण्यात येणार आहेत. याचा तोटा भरुन काढण्यासाठी मोबाईल कंपन्या रिचार्जचे दर वाढवणार असल्याचे बोलले जात आहे.

सरासरी महसूलामध्ये सुधारणा करण्यासाठी मोबाईलच्या रिचार्जचे दर वाढवण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. यासाठी कंपन्या आता स्वस्तातील रिचार्ज (Recharge) करुन सीम कार्ड चालू ठेवणाऱ्यांची सेवा बंद करणार आहे. याअगोदर डिसेंबर २०२१ मध्ये कंपन्यांनी रिचार्जचे दर वाढवले होते. या दरवाढीनंतर अनेक ग्राहकांनी आपले सीम बंद केले होते. त्यामुळे रिलायंस जियोच्या वापरकर्त्यांची संख्या वाढली होती.

एअरटेल (Airtel) कंपनी आपली एआरपीयु वाढवणार आहे आणि रिलायन्स जिये आपल्या अॅक्टीव्ह पारकर्त्यांच्या नेटवर्क मध्ये सुधारणा करत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. यामुळे भविष्यात रिचार्जची दरवाढ होणार आहे. एअरटेल त्यांचा एआरपीयु २०० पर्यंत घेवून जाणार आहे. जो याअगोदर डिसेंबरमध्ये १६३ होता. वोडाफोन, आयडियानेही दरवाढ करण्याची तयारी केली आहे.

एका अहवालानूसार, रिचार्जचे दरवाढ झाले असल्यामुळे वायरलेस ग्राहकांची संख्या कमी झाली आहे. पण आता अॅक्टीय वापरकर्त्यांची संख्या वाढली आहे. याअगोदर अनेकांकडे दोन सीम कार्ड होते. ज्यातील एक कार्ड बंद ठेवले असायचे पण आता रिचार्ज (Recharge) वाढल्याने एक सीम अॅक्टीव्ह झालेल्यांची संख्या वाढली आहे.

crime24tass
Author: crime24tass

Leave a Comment

[espro-slider id=28419]