Crime 24 Tass

तब्बल 18 दिवसांनंतर सदावर्ते तुरुंगाबाहेर;म्हणाले, हा विजय…

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक (Silver Oak) निवास्थानावर हल्ला करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचे वकील अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) अखेर 18 दिवसांनी तुरुंगातून बाहेर आले आहेत.सदावर्तेंना 8 एप्रिल रोजी मुंबईतील त्यांच्या निवास्थानातून सिल्व्हर ओक येथील हल्ल्यामागे संपकरी एसटी कर्मचाऱ्यांचे माथी भडकवल्याचा आरोप करत अटक करण्यात आली होती. मात्र, आता अखेर तब्बत 18 दिवसांनी सदावर्ते बाहेर आले आहेत. तुरुंगातून सुटका होताच सदावर्तेंनी हा हिंदुस्थान्यांचा विजय असल्याचे म्हटले आहे. (Adv. Gunaratna Sadavarte Released From Jail )तुरुंगातून बाहेर पडताना सदावर्ते म्हणाले की, या कठीण काळात माझा मित्र परिवार, हिंदुस्थानातील जनता आणि कष्टकरी बांधन माझ्यासोबत राहिले. तसेच येथून आमचा केंद्रबिंदू हा महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम जेजे करता येईल त्यासाठी असेल, असे म्हणत जय श्री राम म्हणणारे, जय भीम म्हणणारे आणि हम है हिंदुस्थानी म्हणणारे जिंकत असतात अशा घोषणा सदावर्तेंनी यावेळी दिल्या. हा विजय हिंदुस्थान्यांचा आणि कष्टकरी बांधवांचा असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

पुण्यातील तक्रारीसाठी अटकपूर्व जामीन

एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना हायकोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. पुण्यात 2020 मध्ये दाखल करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये न्यायालयाने सदावर्तेंना अटकपूर्व जामीन दिला आहे. 25 हजारांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. 2020 मध्ये सदावर्ते यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्याप्रकरणी ताबा मिळवण्यासाठी पुणे पोलिसांनी अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाच्या आदेशामुळे पोलिसांना सदावर्तेंवर कारवाई करता आली नाही. (High Court Grant Pre Arrest Bail To Gunaratna Sadavarte In Pune Case)

crime24tass
Author: crime24tass

Leave a Comment

[espro-slider id=28419]