Crime 24 Tass

भोंग्यावरून पहिला गुन्हा दाखल; राज ठाकरेंच्या सभेआधीच तक्रार; प्रकरण चिघळणार

औरंगाबाद: राज्यात मनसेकडून (Maharashtra Nav Nirman Sena) ज्या भोंग्यावरुन राजकारण सुरु करण्यात आले. जो भोंगा आणि हनुमान चालीसावरुन (Hanuman Chalisa ) आमदार, खासदार असणारे राणा दांपत्याला कोठडीची हवा खावी लागली, त्याप्रकरणावरुन आता औरंगाबादमध्ये राज्यातील पहिला गुन्हा दाखल केला गेला आहे.

मस्जिदीकडे भोंग्याचे (Loudspeaker) तोंड करुन गाणे वाजवल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून रेल्वे पोलीस दलातील कर्मचारी किशोर गंडापा मलकूनाईक यांच्या विरोधात सातारा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची 1 मे रोजी औरंगाबादमध्ये जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. राज ठाकरे यांच्या या सभेला काही राजकीय पक्षांनी विरोध केला आहे. त्यामुळे हा वाद ताजा असतानाच हा गुन्हा दाखल केला गेल्याने औरंगाबादमधील राजकीय वातावरण अधिकच चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.

रेल्वे कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा

औरंगाबादमधील सातारा पोलीस स्थानकात मस्जिदीकडे भोंग्याचे तोंड करुन गाणे वाजवल्यानंतर रेल्वे कर्मचारी असणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला गेला आहे. त्यानंतर तातडीने भाजपने सातारा पोलीस स्थानकाला भेट देऊन याप्रकरणाची माहिती घेण्यात आली. याप्रकरणी गुन्हा मागे घेण्याचीही मागणी करण्यात आली आहे. भाजप कार्यकारिणीनी या प्रकरणाची चौकशी करावी नंतरच गुन्हा नोंद केला जावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

औरंगाबादमध्ये मस्जिदीकडे भोंग्याचे तोंड करुन गाणे वाजवल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कृत्यामुळे दोन्ही समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर भाजप कार्यकारिणीने सातारा पोलिसात जाऊन भेट घेऊन गुन्हा मागे घेण्याची मागणी केली आहे.

crime24tass
Author: crime24tass

Leave a Comment

[espro-slider id=28419]