भंडारा : गुजरातचे काँग्रेसचे आमदार जिग्नेश मेवानी यांना आसामच्या पोलिसांनी अटक केली. ही अटक बेकायदेशीर असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. मेवानी यांची त्वरित सुटका करावी यासह महागाईच्या विरोधात भंडारा काँग्रेसने राष्ट्रीय महामार्गावरील एका पेट्रोल पंपावर जुमला आंदोलन केले.
भंडारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मोहन पंचभाई, महिला जिल्हाध्यक्ष जयश्री बोरकर, अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष सुरेश मेश्राम यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. या निवेदनात, गुजरातच्या वडगाव येथून निवडून आलेले आमदार जिग्नेश मेवानी यांनी पंतप्रधानांविरुद्ध ट्विट केल्याने त्यांच्यावर आसाम येथे गुन्हा नोंद करून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. ही अटक बेकायदेशीर असून त्यांना तातडीने सोडावे, अशी मागणी काँग्रेसने केली या
वेळी केंद्र सरकारने केलेली भाव वाढ याचा निषेध करण्यात आला.
यावेळी प्रेमसागर गनवीर माजी जिल्हाध्यक्ष, सुरेश मेश्राम, राजेश हटवार, सहर अध्यक्ष प्रशांत देशकर, जी प गटनेता रमेश पारधी,शफी लद्दानी, राजू पालीवाल, सुभाष मा. आजवले उपाध्यक्ष भंडारा जिल्हा,प्रेमदास वनवे जि.प. सदस्य ,राजु रा. निर्वाण अध्यक्ष, लाखनी तालुका, योगेश गायधने, देवेंद्र हजारे, अजय चवडे, संदीप बावनकुडे, मारखंड बडोले, राजेश हलमारे, नवाब पटेल, सदानंद धारगावे, महेंद्र वाहने, पवन मस्के, पवन वंजारी, आकाश कोरे,
बालू ठवकर, संजय सार्वे, महबूब खान, सोनू कोटवानी, सचिन फाले, तुलसीराम बिलवने,धर्मेंद्र गनविर, शिव बोरकर, विजय कापसे, नरेंद्र रामटेके, भाऊ कातोरे, धर्मराज रामपुर, नितिन रामपुर, विलास रामपुर, राकेश कोडापे, सुनील बातें, विजय सार्वे, प्रणाली सार्वे, स्वप्निल अरिकार, परमेश वालके, विकास वासनिक, सौ मनीषा हलमारे, सौ योगीता झलके, सौ सरिता कापसे, विद्या कुंभरे, डॉ मनीषा निंबार्ते, शालू ताई तिरपुडे, अनिता भूरे, आकाश बोंद्रे, प्रमोद कटरे, एकनाथ भूरे अनेक कार्यकर्ता उपस्थित होते.
