नागपूर : अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बॉयफ्रेंडध २ सख्या भावांनी सामूहिक बलात्कार (Atrocities) केल्याची खळबळजनक घटना जरीपटका पोलिस (police) ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी (police) बॉयफ्रेंड यश कांबळे (वय-१९, रा. इंदोरा) याला अटक करण्यात आली आहे.
तर ऋषिल खोब्रागडे (वय-१९) आणि रक्षित खोब्रागडे (वय-२१) या २ भावांचा शोध पोलिस घेत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी ही १७ वर्षांची आहे. ती अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. तर यश हा मोलमजुरी करत असतो. एकाच वस्तीत राहत असल्यामुळे तिची यशबरोबर ओळख होती.
ओळखीचे रूपांतर मैत्रीत नंतर प्रेमात झाले. दोघे देखील २०२० पासून प्रेम संबंधात होते. दरम्यान, मुलीला दुसऱ्या युवकाबरोबर प्रेम झाले. यामधून दोघांमध्ये सतत भांडणे व्हायला लागली. यामुळे मुलगी यशला भाव देत नव्हती. या कारणाने यश चिडायचा. अधून- मधून तो मुलीच्या संपर्कात राहत होता. दोघांत बोलणे देखील होत होते.१७ एप्रिलला यशने मुलीला घरी बोलावले होते .
यशच्या घरी कुणीच नव्हते. त्याने अगोदर मुलीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. आणि काही वेळातच या भागामध्ये राहणारे यशचे मित्र ऋषिल आणि रक्षित दोघे देखील घरी आले. यशने मुलीला तुझे अश्लील व्हिडिओ असल्याचे सांगत, ते व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर दोघांनीही यशच्या मदतीने तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला आहे.
मुलीने २४ एप्रिल दिवशी जरीपटका पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी अगोदर यशवर बलात्काराचा गुन्हा नोंदवला आणि अटक केली आहे. मुलीची वैद्यकीय तपासणी करताना डॉक्टरांकडे तिने ऋषिल आणि रक्षित या दोघांची नावे घेतली. यामुळे घटनेच्या दिवशी तिघांचा सहभाग होता, असे पोलिसांना सांगितले होते. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
