संबधित घटनेच्या व्हिडिओ स्थानिक आमदारांनी दिला प्रसारमाध्यमांना…
पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाही करण्याची स्थानिक आमदारांची केली मागणी…
भंडारा उपविभागीय अधिकारी यांना मारहाण करणाऱ्या आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्यां पवनी पोलिसांचा आरोपी सोबतच मटण पार्टी करतांना एक व्हिडिओ सद्धा जोरदार वायरल झाला असून हा व्हिडिओ भंडारा- पवनी विधानसभा क्षेत्राचे आमदारांनी प्रसारमाध्यमांना दिला आहे.
हा वीडियो दाखवत पोलिस आणि वाळू माफ़िया यांचे संबध किती मधुर असल्याची आरोप नरेंद्र भोंडेकर यांनी केला. अधिकाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या आरोपीना पवनी पोलिस कसे पकडतील असा प्रश्न उपस्थित करत असा पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाही करण्याची स्थानिक आमदारांची मागणी केली. विशेष म्हणजे पार्टी करतांना त्या पोलिस कर्मचाऱ्यांचे संभाषण मोठा धक्कादायक खूलासा करीत आहे.
“हा तर किरकोळ विषय आहे, तुमसर पोलीस स्टेशनला असताना अनेक आरोपींची नावे स्वता उडविली आहेत” असा धक्कादायक खुलासा पवनी पोलीस स्टेनमध्ये कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यांनी केल्याच्या व्हिडिओ मध्ये दिसत आहे. त्याच्या या व्हिडिओ ने आता पोलीस विभागात खळबळ माजली आहे. काल पहाटे 3:30 मिनिटांच्या दरम्यान भंडारा उपविभागीय अधिकारी यांना 20 ते 25 वाळू माफियांना हल्ला चढवत त्यांच्या गाडीचे काचा फोडल्या व उपविभागीय अधिकारी यांनी सुद्धा मारहाण झाली, या प्रकरणी उपविभागीय अधिकारी यांनी पवनी पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी आरोपींच्या शोधात पथक रवाना केले. मग काय पोलिसांना आरोपी गवसला त्याला पकडून आणण्यापेक्षा पोलिसांनी त्याच्यासोबत एका हॉटेल मध्ये मटण पार्टी केल्याचा हा वीडियो मध्ये दिसत असल्याच्या आरोप आमदार महोदयानी केला आहे. विशेष म्हणजे तुमच्या किरकोळ विषय आहे तुमसर पोलीस स्टेशनला असताना अनेक आरोपींची नावे उडविली असा खुलासाच करून ह्या व्हिडिओ मध्ये एका पोलिसानेच करून टाकल्याने या व्हिडिओ मध्ये दिसत असलेल्या पोलिसांना निलंबित करत कारवाई करण्याची मागणी स्थानिक आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी गृह मंत्री यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
