Crime 24 Tass

एसडीओ हल्ला प्रकरणी चार आरोपींना अटक,१८ चा शोध सुरु- पोलीस अधिक्षक वसंत जाधव

आरोपींच्या मोबाईलचा सीडीआर तपासणार

दोन वर्षात रेती तस्कारांवर ७३ गुन्हे दाखल १४५ आरोपींना अटक

भंडारा :उपविभागीय दंडाधिकारी भंडारा रविंद्र शंकर राठोड हे अवैध रेती वर कायदेशीर कारवाई करण्याकरीता आपल्या स्टाफ सह पवनी तालुक्यातील गेले असता मौजा बेटाळा येथे रेती तस्कराकडुन झालेल्या भ्याड हल्ल्याची आम्ही कसुन चौकशी करीत आहोत . याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली असून १८ फरार आरोपींचा शोध घेणे सुरु आहे . रेती तस्कारांच्या मुसक्या आवरण्याकरीता पोलीस विभाग सतत कार्यरत असून दोन वर्षात रेती तस्करांवर ७३ गुन्हे दाखल करण्यात आले असून १४५ आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी आज पत्रपरिषदेत दिली .

पोलीस अधीक्षक वसंत जाधव पुढे म्हणाले , स्थानिक गुन्हे शाखा, उपविभागीय पोलीस अधिकारी पवनी व पोलीस स्टेशन पवनी यांचे वेगवेगळे पथक तयार करुन गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेवून त्यांना अटक करण्यात येत आहे . सध्या पर्यत आरोपी नामे धर्मेंद्र सुदाम नखाते ( ३० ) रा.मोखारा,राजेश वामन मेघरे ( ३८ ) रा.बामणी, राहुल गोपाल काटेखाये ( ३३ ) रा. रुयाळ व प्रशांत मुलचंद मोहरकर रा. जुनोना असे एकुण ०४ आरोपींना ताब्यात घेतले असुन त्यांची चौकशी करुन गुन्ह्यातील आणखी आरोपी निष्पन्न करण्याचे कार्य युध्द पातळीवर सुरु आहे.

पोलीसांच्या व्हिडीओतील स्टेटमेंटचा तपास करण्यात येणार

बोला बुक्कावन,दिनेश बांगळकर,आकाश पंचभाई,गणेश मुंडले,अक्षय तलमले,सागर बरडे,प्रदीप भोंदे,मंगेश नागरीकर,भुते यांचा दिवानजी,प्रणय तलमले,चेतन बावनकर,भुषन भुरे,जितु तलमले,प्रतिक नागपुरे,गणेश जुनघरे,नितीन जुनघरे,विक्रम हटवार,अमोल भोंदे यांचा शोध घेणे सुरु आहे. तपास पथकातील व्हायरल झालेल्या व्हिडीओतील तिन पोलीसांना कालच निलंबीत करण्यात आले आहे. पोलीसांच्या व्हिडीओतील स्टेटमेंटचा तपास करण्यात येणार आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर गुन्हा रद्द करता येत नाही. साकोलीचे उपविभागीय अधिकारी याचा पूर्ण तपास करीत आहे. त्यानंतरच सर्व पुढे येईल,असेही वसंत जाधव म्हणाले.

सन २०२१ मध्ये रेती तस्करीचे एकुण ४ ९ गुन्हे दाखल ११२ आरोपींना अटक करण्यात आली आहे . ज्यात १२७.५ ब्रास रेती कि.४,८६,३१,०७० रु. ६७ वाहन कि .४,५४,६९,६७० रु. असा एकुण ९,४१,००,७४० रु. किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . तसेच एकुण ३९ आरोपीतांवर प्रतिबंधक कारवाई देखील केली आहे . सन २०२२ मध्ये रेती तस्करीचे एकुण १४ गुन्हे दाखल ३३ आरोपींना अटक करण्यात आली आहे .

ज्यात १९ ब्रास रेती कि १,१४,७०० रु.,वाहन कि.५३,०५,००० रु.,असा एकुण ५,४९,७०० रु.किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . तसेच एकुण ६ आरोपीतांवर प्रतिबंधक कारवाई देखील केली आहे . असे दोन वर्षात एकुण ७३ गुन्हे दाखल १४५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. ज्यात १४६.५ ब्रास रेती कि.४,८७,४५,७७० रु.,८० वाहन कि.५,०७,७४,६७० रु.,असा एकूण ९,४६,५०,४४० रु. किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच एकुण ४५ आरोपीतांवर प्रतिबंधक कारवाई देखील केली आहे . भंडारा पोलीस दलातर्फे रेती तस्करांविरुध्द प्रभावी मोहीम राबवुन त्यांच्या विरुध्द कारवा करण्यात येते .

पोलीस दलातर्फे रेती तस्करांविरुध्द प्रभावी मोहीम

तसेच रेती तस्करी वर आळा घालण्याकरीता वेळो – वेळी विशेष पथक तयार करण्यात येत असून त्यांच्या मार्फतीने कारवाई करण्यात येत असते . महसुल विभाग व खणिकर्म विभागाच्या संयुक्तीने देखी कारवाई करण्यात येत असते . रेती तस्करीवर आळा घालण्याकरीता वेगवेगळ्या ठिकाणी पोलीस चौक बसविल्या असुन चोविस तास तेथे पोलीस व होम गार्ड तैनात केले आहे . पोलीस स्टेशन व रात्र गस्त पथकांना रेती घाट चेक करुन चोरट्या रेती उपसा व वाहतुकीवर योग्य कारवाई करण्याचे स्पष्ट सुचना देण्यात आल्या आहेत , असेही वसंत जाधव पत्रपरिषदेत म्हणाले . यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक थोरात , स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जसवंत चव्हाण , भंडारा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुभाष बारसे उपस्थित होते .

crime24tass
Author: crime24tass

Leave a Comment

[espro-slider id=28419]