Crime 24 Tass

Bhandara:एलसीबीचा आयपीएल सट्टयावर छापा


रेस्टॉरंट मालकाला अटक: दुसऱ्याचा शोध सुरू

भंडारा : करडी येथील एका रेस्टॉरंटच्या मागे सुरू असलेल्या आयपीएलच्या सट्टयावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा घातला. यात रेस्टॉरंट मालकाला मुद्देमालासह अटक केली. ही कारवाई शनिवारी रात्री केली.
अविनाश केशव बावनकर (३३) रा. ग्रामपंचायत चौक, सुभाष वॉर्ड, करडी असे अटक करण्यात आलेल्या रेस्टॉरंट मालकाचे नाव आहे. अविनाश याचे करडीत अविनाश रेस्टॉरंट आहे. येथून अविनाश हा तुमसर येथील शेखर उर्फ सोनू अग्रवाल (३२) याच्या सांगण्यावरून आयपीएलच्या क्रिकेट मॅचवर पैशाची बाजी लावून नागरिकांकडून पैसे घेऊन आकडे उतरवित होता. या मिळालेल्या माहितीवरून भंडारा येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा घातला.
या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अविनाश बावनकर याच्या ताब्यातून दोन मोबाईल हँडसेट, आयपीएलचे आकडे लिहिलेली पट्टी व साहित्य, रोख २,३५० रुपये, असा मुद्देमाल ताब्यात घेतला. अविनाशविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली असून पोलीस शेखर उर्फ सोनू अग्रवाल याचा शोध घेत आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अप्पर पोलीस अधिक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीनचन्द्र राजकुमार, पोलीस उपनिरीक्षक विवेक राऊत, पोलीस कर्मचारी सुधीर मडामे, धर्मेंद्र बोरकर, नितिन महाजन, हरिदास रामटेके, नंदकिशोर मारबते, बावणे, आशिष तिवाडे, मंगेश मालोदे, सुमेश रामटेके, निखिल रोडगे यांनी केली.

crime24tass
Author: crime24tass

Leave a Comment

[espro-slider id=28419]