भंडारा : रेतीच्या वाहतुकीचा परवाना नसतानाही जिल्ह्यातून रेतीची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे. अशाच एका रेतीची वाहतूक करणाऱ्या टिप्परने दुचाकीस्वार मायलेकाला जबर धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार दोघांचाही घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला.

ती घटना मोहाडी तालुक्यातील सातोना येथे सोमवारला सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली. गीता रहांगडाले आणि राजू रहांगडाले असे मृतक मयलेकाचे नाव आहे. मृतक मायलेक हे नागपूर जिल्ह्यात असून ते दुचाकीने तिरोडा येथे जात होते. तर, अपघाताला कारणीभूत टिप्पर हा नागपूरच्या दिशेने जात होता. वरठी पोलिसांनी टिप्पर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
