हत्ये प्रकरणी दोन आरोपींना अटक
भंडारा : दिनांक 28/04/2022 रोजी ग्राम नवेगाव ( कोका ) लगत असलेल्या वनविभागाच्या संरक्षित वनात नवेगाव येथिल बबिता तिरपुडे रा .नवेगाव( कोका ) हिचा कोणीतरी अज्ञात इसमाने तिच्या डोक्यावर काठी मारून व तिचा गळा दाबुन खुन केल्याचे फिर्यादीच्या तक्रारीवरून पो.स्टे . कारधा येथे कलम 302 भादवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदरच्या गुन्ह्याचे तपासात गोपनिय बातमीदाराकडुन मिळालेल्या माहितीच्या आधारे संशईत आरोपी( 1 )राजहंस कुंभरे,( 2 ) विनोद रामटेके दोन्ही रा. नवेगाव( कोका )यांना ताब्यात घेवून गुन्ह्याचे संबंधाने सखोल विचारपुस केली असता आरोपी राजहंस कुंभरे याने मृतक महिला बबिता तिरपुडे हिने जादूटोणा केल्यामुळेच त्याची पत्नी मायाबाई हिचा मृत्यु झाला आहे.
असा संशय घेवून मनात राग धरून त्या गोष्टीचा बदला घेण्याकरिता बबिता तिरपुडे हिचा खुन विनोद रामटेके ह्याच्या मदतीने केल्याची कबुली दिली नमुद गुन्ह्यात दोन्ही आरोपीतांना अटक करून गुन्हा उघडकीस आणण्यात आला. मा. पोलीस अधिक्षक वसंत जाधव,अपर पोलीस अधिक्षक अनिकेत भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी विजय डोळस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेशकुमार थोरात पोलीस स्टेशन कारधा, पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण स्थागुशा भंडारा,सपोनि ऋषीकेश चाबुकस्वार,प्रशांत मिसाळे,परीपोउपनि घनश्याम नवखरे,पोहवा.गिरीश बोरकर,रोशन गजभिये,विजय राऊत,विनय साठवणे,पो.अंमलदार रमेश वाघाडे,कांतीस कराडे,प्रमोद आरीकर,दत्तु झंझाड यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणला . सदर या गुन्ह्याचा पुढील तपास पो.नि. राजेशकुमार थोरात पोलीस स्टेशन कारधा हे करित आहेत .
Bhandara Axident :रेतीच्या टिप्परने मायलेकाला चिरडले :सातोना येथील घटना
