मृतकाच्या भावाचाही पाण्यात बुडून मृत्यू : भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील घटना
भंडारा : कौटुंबिक कलहातून जावयाने सासऱ्याचा खून करून मृतदेह गोसेखुर्द धरणाच्या उजव्या कालव्यात फेकला. मृतदेह काढण्यासाठी कालव्यात उतरलेल्या भावाला पोहता येत नसल्याने त्यांचाही कालव्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यात घडली.
हरी नागपुरे रा. सिंधी असे मृतक सासाऱ्याचे नाव आहे. त्यांचा मृतदेह काढण्यासाठी पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या भावाचे नाव चंद्रभान नागपूरे असे आहे. तर, सासाऱ्याचा खून केल्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या जावयाचे नाव अनिल हटवार रा. वाही असे आहे.

आरोपी जावई अनिल हटवार याला पवनी पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी रीना जनबंधू,पोलीस निरीक्षक जगदीश गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक आशिष चिलांगे,परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र तिजारे,महिला पोलिस कर्मचारी सुमित्रा साखरकर अधिक तपास करीत आहे. या घटनेने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
Bhandara crime : जादूटोण्याच्या संशयातून हत्या : कोका जंगलातील घटना
