Crime 24 Tass

निशुल्क प्रशिक्षण शिबिराचे लाभ घेण्याचे आव्हान – पंकज मुंधडा

भंडारातील जनउन्नती बहुद्देशीय संस्थे द्वारा 04 मे 2022 रोजी वाणिज्य क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी अकाउंट्स, फायनान्स, बँकिंग, इन्व्हेस्टमेंट, व टॅक्सएशन ह्या विषयांवर आधारित पाठ्यक्रमावर ३० दिवस चालणाऱ्या निशुल्क प्रशिक्षण शिबिराचा समारंभ झाला. ह्या शिबिराच्या समारंभ निमित्त भांडाराचे अफ्लाटस अकॅडेमि चे संस्थापक श्री दीप्तीश सपाटे, कॅनरा बँक अधिकारी श्री पियुष कानकोटे आणि संस्थेच्या वतीने CA पंकज मुंधडा उस्थित होते.

ह्या कार्यक्रमाच्या द्वारे उपस्थित विध्यार्थाना श्री पियुष कानकोटे ह्याच्याशी संपर्क साधता आला. श्री पियुष कानकोटे ह्यांनी विध्यार्थाना वाणिज्य क्षेत्रात उपलब्ध असलेल्या संधींची जाणिव करून दिली तसेच बँकिंग क्षेत्रात होणाऱ्या विविध प्रवेश परीक्षे बद्दल माहिती दिली..

श्री दीप्तीश सपाटे ह्यांनी विध्यार्थाना परदेशी भाषेच्या ज्ञानाच्या साहाय्याने भविष्य घडविण्यासाठी प्रेरणा दिली. एकविसाव्या शतकात भारतचा जागतिक पातळीवर होणाऱ्या व्यवसायात मोलाचा वाटा आहे. हे लक्षात घेऊन विध्यार्थानी काही ठराविक परदेशी भाषेचा ज्ञान आत्मसात केला तर त्यांना जागतिक पातळीवर मल्टिन्याशनल कंपनी मध्ये नोकरी मिळण्यासाठी कशा प्रकारे मदत होऊ शकते ह्याची माहिती श्री दीप्तीश सपाटे ह्यांनी दिली.

संस्थेचे संस्थापक पंकज मुंधडा ह्यांनी स्वतः निर्माण केलेल्या पाठ्यक्रमाची जाणीव विध्यार्थाना करून दिली. त्यांनी आजच्या स्पर्धेच्या जगात कौशल्य आधारित शिक्षणाच्या गर्जेबद्दल सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी श्री पंकज मुंधडा ह्यांनी उपस्थित मान्यवरांना आभार व्यक्त केले.

crime24tass
Author: crime24tass

Leave a Comment

[espro-slider id=28419]